'सिमी' खटल्यात आरोपींना दहा वर्षे सक्तमजुरी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 2 एप्रिल 2017

जळगाव - देशभरात बहुचर्चित "सिमी'च्या (स्टुडंट इस्लामिक मूव्हमेंट ऑफ इंडिया) खटल्यात जिल्हा न्यायालयाने आसिफ खान बशीर खान व परवेज खान रियाजोद्दीन खान (दोन्ही रा. जळगाव) या दोन्ही आरोपींना शनिवारी दहा वर्षे सक्तमजुरी व दहा हजारांचा दंड ठोठावला. फौजदारी कटकारस्थान 120 (ब) या कलमान्वये शुक्रवारी न्या. ए. के. पटणी यांच्या न्यायालयाने या दोघांना दोषी ठरविले होते. त्यानंतर आज या दोघांना सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. खटल्यात प्रमुख संशयित आसिफ खान बशीर खान हा पुणे येथील येरवडा कारागृहात असून त्याला व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे हजर करण्यात आले होते. दुसरा संशयित परवेज खान याला शुक्रवारपासूनच (ता. 31) ताब्यात घेतले असून, निकालानंतर कारागृहात पाठविण्यात आले.
Web Title: accused punishment in simi case