आरोपीला कठोर गुन्हा नोंदवून शिक्षेची कारवाई व्हावी - आ. जयवंत जाधव

संजीव निकम
शुक्रवार, 23 मार्च 2018

नांदगाव : शहरातील अल्पवयीन मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपीला कठोर गुन्हा नोंदवून शिक्षेची कारवाई व्हावी अशी मागणी आमदार जयवंत जाधव यांनी आज विधान परिषदेत केली.

विधानसभेच्या सभागृहातले कामकाज सुरु असताना आमदार जयवंत जाधव यांनी औचित्याच्या मुद्यांवर हा प्रश्न उपस्थित केला. पाच दिवसांपूर्वी शहरातील एका पाच वर्षीय अल्पवयीन बालिकेवर मोबाईल खेळण्याचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार करण्यात आले याप्रकरणी पोलिसांनी संशयित अविनाश संतोष सरग याला अटक केली होती.

न्यायालयाच्या आदेश नंतर त्याची नाशिकच्या बाल सुधारगृहात रवानगी करण्यात आली होती. दरम्यान आज दुपारी सर्वपक्षिय शिष्टमंडळाने नांदगावचे पोलीस निरीक्षक बशीर शेख यांची भेट घेत बालिकेवरील झालेला लैंगिक अत्याचार माणुसकीला काळिमा फसणार असल्याने त्याचा  निषेध व्यक्त व्यक्त करण्यात येऊन अत्याचार करणाऱ्या दोषीवर कठोर कारवाई व्हावी व भविष्यात असा प्रकार पुन्हा घडणार नाही यासाठी कलम लावण्याची मागणी करण्यात आली.

भाजपाचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय छाजेड, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संतोष गुप्ता, सामाजिक कार्यकर्ते महेंद्र बोरसे, नरेंद्र पाटील, कळमदरीचे उपसरपंच देविदास पगार, साकोराचे उपसरपंच अतुल पाटील, विक्रांत कवडे, संजय मोकळं, संगीता सोनवणे, समाधान पगार, सचिन जाधव, तुकाराम बोरसे, राजेंद्र भामरे यांच्यासह साकोरा,कळमदरी व शहरातील विविध सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते 

Web Title: The accused should be punished - jaywant jadhav