देवळाली प्रवरा नगरपालिकेच्या मुख्याधिकार्यांवर लाच प्रकरणी कारवाई

देवळाली प्रवरा नगरपालिकेच्या मुख्याधिकार्यांवर लाच प्रकरणी कारवाई

राहुरी - देवळाली प्रवरा नगरपालिकेचे मुख्याधिकारी नानाभाऊ विश्वनाथ महानवर व सहाय्यक फायरमन मुकुंद रामराव मुसमाडे यांना दोन लाख रुपयांची लाच स्विकारल्याप्रकरणी नगर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले.

आज (बुधवारी) दुपारी एक वाजता ही कारवाई झाली. अधिक माहीती अशी, तक्रारदार हे विविध शहरात साफसफाईच्या कामाचे ठेकेदार आहेत. त्यांनी मे २०१८ मध्ये राहाता शहरातील साफसफाईची पालिकेत घनकचरा व्यवस्थापनाची ई निविदा भरली होती. ही निविदा मंजूर झाली. एक डिसेंबर २०१८ पासून त्यांनी कामाला सुरुवात केली. परंतू, ५ जानेवारी २०१९ रोजी राहाता पालिकेचे मुख्याधिकारी यांनी तक्रारदार यांना कामबंदची नोटीस दिली. त्यात, तक्रारदार विरुद्ध कामासंबंधीच्या तक्रारी होत्या. महिला कामगारांना कामावरुन कमी केल्याचा उल्लेख होता.

आरोपी लोकसेवक नानाभाऊ महानवर यांनी तक्रारदारास बोलविले. "माझ्याकडे जिल्हा नियोजन अधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार होता. त्यावेळी निविदा मंजूर केली होती. सध्याचे राहाता नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांचेशी मध्यस्ती करुन, सध्या कामबंदचा असलेला आदेश मागे घेण्यास सांगतो." असे म्हणून, त्या बदल्यात बक्षीस म्हणून निविदा रकमेच्या सहा टक्के रकमेची मागणी केली. त्यामुळे, तक्रारदार यांनी लाचलुचपत विभाग, नगर यांच्याशी संपर्क साधला. ३० जानेवारी २०१९ रोजी त्याची पडताळणी झाली. तेव्हा, महानवर यांनी तक्रारदार यांच्याकडे दोन लाख रुपयांची लाचेची मागणी केल्याचे स्पष्ट झाले.

आज महानवर यांनी देवळाली प्रवरा नगरपालिकेचे सहाय्यक फोरमन मुसमाडे यांना लाच स्विकारण्यास सांगितले. त्यांच्या सांगण्याप्रमाणे मुसमाडे यांनी राहुरी फॅक्टरी येथे नगर-मनमाड महामार्गावर सेंन्ट्रल बँकेसमोर रस्त्यावर लाचेची रक्कम स्विकारतांना पथकाने रंगेहाथ पकडले. पोलिस उपअधीक्षक किशोर चौधरी यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com