धुळे हत्याकांडातील दोषींवर कारवाई झाली पाहिजे - डॉ. आंबेडकर

हुकूम मुलाणी 
बुधवार, 4 जुलै 2018

धुळे हत्याकांडापुर्वी जी अफवा पसरवली गेली त्यांच्यावरही पहिल्यांदा कारवाई झाली पाहिजे कारण त्यांनी जर अफवा पसरवली नसती तर हे हत्याकांड घडले नसते असे भारिप नेते प्रकाश आंबडेकर यांनी व्यक्त केले आहे.

मंगळवेढा - धुळे हत्याकांडापुर्वी जी अफवा पसरवली गेली त्यांच्यावरही पहिल्यांदा कारवाई झाली पाहिजे कारण त्यांनी जर अफवा पसरवली नसती तर हे हत्याकांड घडले नसते असे भारिप नेते प्रकाश आंबडेकर यांनी व्यक्त केले आहे.

धुळे हत्याकांडात मृत्यमुखी पडलेल्या भोसले, मालवे या मृत नातेवाईकांचे सांत्वन करण्यासाठी ते खवे येथे आले होते त्यावेळी ते बोलत होते, यावेळी उपराकार लक्ष्मण माने, उपनराध्यक्ष चंद्रकांत घुले, विठठल कारखान्याचे संचालक भगिरथ भालके, समाजकल्याण सभापती शिला शिवशरण, नगरसेवक प्रविण खवतोडे, राहूल सावंजी, दामाजीचे संचालक सचिन शिवशरण, धनश्री परिवाराचे शिवाजी काळुंगे, बुवा गायकवाड, धनाजी सरवदे, बाबा कौडू भैरी, दत्तात्रय भोसले, काका डोंगरे, बसवराज पाटील, भैरू भोसले, मच्छिद्र भोसले, मारुती भोसले यांच्यासह खवेतील ग्रामस्थ व नातेवाईक उपस्थित होते.

भारिप नेते आंबडेकर बोलताना म्हणाले की, अनुदान देवून शासनाने आपली जबाबदारी झटकली आहे असे न होता या समाजाचे कायमस्वरुपी पुर्नवसन होण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. या समाजाची भटकंती थांबण्यासाठी शासनाने लक्ष घातले पाहिजे. यापुर्वी, एखादया प्रकरणात पोलीस कारवाई होत होती पण आज लोकच कायदा हातात घेवू लागले. भिक्षा मागणून पोटाची खळगी भरणाय्रा या पाच मृताची हत्या करणाऱ्यांना शिक्षा झाली पाहिजे. भिक्षा मागताना समाजकटंकाकडून होणाऱ्या हल्याच्या सरंक्षणासाठी शासनाचे ओळखपत्र मिळाले पाहिजे या समाजाच्या 70 वर्षे चालत असलेल्या लढयाचे नेतृत्व करण्याची मागणी मच्छिद्र भोसले यांनी केली असता ते म्हणाले की, मी लढत आलो आताही तुमच्याबरोबर आहे, नातेवाईकांनी आम्हाला न्याय मिळावा म्हणून महाराष्ट्र बंद करावा अशी मागणी केली असता शासनाचा निर्णय होतोय ते बघू याबाबत निर्णय घेतला जाईल, आता पर्यंत या घटनेत इथली राजकीय व्यवस्था संवेदनशील आहे. दक्षता घेतलेली आहे. यावेळी या समाजाच्या भावना परिस्थितीची जाणीव सुखदेव भोसले यांनी करुन दिली.

Web Title: Action must be taken against guilty in Dhule murder case says Dr. Ambedkar