आदीशक्तीपीठ सप्तशृंगीच्या नवत्रोत्सवाची जय्यत तयारी

nashik.
nashik.

वणी (नाशिक) : उत्तर महाराष्ट्राचे कुलदैवत आदीशक्तीपीठ सप्तश्रृंगी गडावर ता. १० पासून सुरु होणाऱ्या शारदीय नवरात्रोत्सवात प्लस्टीक बंदीची कडक अंमलबजावणी करण्यात येणार असून न्यासाने भाविकांच्या सुरक्षितेसाठी सहा कोटी रुपयांचा अपघाती विमा उतरविला असून मंदिर परीसरात होणारी बोकड बळीची पारंपारीक प्रथा बंदच करण्यात आली आहे.

सप्तश्रृंगी गडावर १० ते १८ ऑक्टोबर पर्यंत नवरात्रोत्सव व ता. २४ व २४ ऑक्टोबर रोजी कावडयात्रोत्सव संपन्न होत आहे. त्यादृष्टीने प्रशासकीय यंत्रणा, सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्ट, सप्तशृंग गड व नांदुरी ग्रामपंचायत यात्रा कालावधीत भाविकांना सोई-सुविघा देण्यासाठी सज्ज होत आहे.

गडावर प्लस्टिक बंदीची कडक अमंलबजावणी.... 
प्लस्टिक पिशव्या बाळगणाऱ्या व्यवसायीकावर फौजदारी गुन्हे दाखल करुन दुकान सील करण्याचा  आदेश प्रशासन व ग्रामपंचायतीस दिला आहे. गडावर येणाऱ्या भाविकांनी प्लस्टिकच्या पिशव्या न आनण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले असून स्वच्छेतेसाठी जागोजागी कचका कुंड्या व सफाई कर्मचाऱ्यांची नेमणूकीच्या करण्यात येत आहे.

मंदीर व्यवस्था...
उत्सवकाळात श्री भगवतीमंदीर भाविकांच्या दर्शनासाठी चोवीस तास खुले ठेवण्यात येणार आहे.भाविकांच्या मदतीसाठी मध्यवर्ती नियंत्रण कक्षाची स्थापना ट्रस्ट कार्यालयात करण्यात आली आहे. या नियंत्रण कक्षात सर्व विभागांचे प्रत्येकी एक अधिकारी २४ तास उपलब्ध राहतील. नियंत्रण कक्षातून भाविकांना ध्वनिक्षेपकाद्वारे सूचना देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. भाविकांसाठी यात्रा कालावधीत मोफत महाप्रसादाची व्यवस्था तर व्हीआयपींसाठी सशुल्क भोजन कक्ष सुरु करण्यात आला आहे. 

नांदुरी -सप्तश्रृंगी गड रस्ता खाजगी वाहानांसाठी बंद...
गडावर यात्रा कालावधीत फक्त राज्य परीवहन मंडळाच्या बसेस वाहतूक करतील. यासाठी नाशिक विभागातील १३ आगारांतर्गत वेगवेगळ्या बसस्थानकातून २५० बसेसचे थेड गडापर्यंत धावतील. तर नांदुरी ते सप्तशृंगगड ७० बसेस भाविकांची वाहतूक करतील. नांदुरी व गडावरील धोंड्या कोंड्या विहीरीजवळ तात्पुरते बस स्थानक उभारण्यात आले असून तेथे प्रवाशांना निवारा शेड व तात्पुरत्या प्रसादन गृहाची व्यवस्था करण्यात येत आहे. 

आरोग्य यंत्रणा...
आरोग्य सुविधेसाठी न्यासाच्या दवाखान्यात २०  खाटांची सुविधा तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र सज्ज ठेवण्यात आले आहे. २१ वैद्यकीय अधिकाऱ्यांसह, ३८ आरोग्य सेवक-सेविका, १६ परीचर, १२ वाहनचालक, १३ औषध निर्माते असे ११० कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून पुरेसा औषधसाठा उपलब्ध करून देण्यात आला आहे.

फनिक्युलर ट्रॉली चे नियोजन...
फनिक्युलर ट्रॉलीच्या माध्यमातून येणाऱ्या भाविकांसाठी मंदिर परिसरात टप्प्याटप्प्याने स्वप्नाची जबाबदारी ट्रेनिंग व्यवस्थापनाचे असून दर तासाला पाच ते सहा फेऱ्यांचे नियोजन केले जाणार आहे. ग्रुपच्या माध्यमातून तासाला १२०० ऐवजी 300 यात्रा 360 भाविकांची ने आण करण्यात यावी जेणेकरून धक्काबुक्की होणार नाही याची काळजी घेण्याची सूचना करण्यात आले आहे तसेच कोजागिरी पौर्णिमा उत्सव निमित्त तारीख 23 व 24 ऑक्टोंबर या कालावधीत काबर धारकांचे अभिषेक व दर्शन पर किया संपेपर्यंत फनिक्युलर ट्रॉली ची सुविधा सर्वसामान्य भाविकांसाठी उपलब्ध नसेल त्यानंतर फनिक्युलर ट्रॉली पूर्ववत सुरू राहिली.

बोकड बळीची प्रथा बंदच.... 
नवरात्राच्या सांगते दरम्यान अर्थात विजयादशमीच्या दिवशी परंपरेनुसार मंदिरात परिसरामधील बोकड बळी व न्यासाच्या सुरक्षारक्षकाकडून बंदुकीची फैरी झाडण्याची प्रथा कायमस्वरूपी बंद करण्यात आली आहे. मंदिर परिसरात बोकड बळी केल्यास त्यावर गुन्हा दाखल करण्याचा आदेश देण्यात आलेला आहे.

पोलिसांचा चोख बंदोबस्त...
नवरात्रोत्सव काळात सहाय्यक पोलिस अधीक्षक, 2 पोलीस उप अधीक्षक, 12 पोलीस निरीक्षक, 25 सहाय्यक पोलीस निरीक्षक व पोलीस उपनिरीक्षक, 270 पोलीस कर्मचारी ७० महिला पोलिस कर्मचारी, 250 होमगार्ड, 50 महिला होमगार्ड, राज्य राखीव दलाची एक तुकडी, अनिरुद्ध अॅकडमीचे जवान, पोलिस मित्र, नागरी सुरक्षा दल, अग्निशमक जवान तसेच विविध सामाजिक संस्थाचे स्वयंमसेवक गडावर ठिकठिकाणी कार्यरत राहाणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com