विमानसेवेचा मुहूर्त पुन्हा टळला

सकाळ वृत्तसेवा 
सोमवार, 8 जुलै 2019

असे आहे विमानसेवेचे नियोजन
अहमदाबाद, जळगाव, मुंबई, कोल्हापूर अशा ठिकाणी ही सेवा सुरू करण्यात येत आहे. साधारणतः पहिल्या ३६ प्रवाशांसाठी १५०० ते २००० असे भाडे असेल. नंतरच्या प्रवाशांसाठी जादा भाडे असेल. कंपनीने विमान सेवा सुरू करण्याबाबतच्या सर्व परवानग्या घेतल्या आहेत. फक्त ‘डीजीसीए’ची परवानगी बाकी आहे. ती अद्याप मिळालेली नाही.

जळगाव - येथील विमानतळावरून जळगाव ते मुंबई अशी विमानसेवा सुरू करण्यासाठी ‘ट्रू जेट’ विमान कंपनीतर्फे हालचाली सुरू झाल्या आहेत. कंपनीने १७ जुलैपासून जळगाव ते मुंबई अशी विमानसेवा सुरू करण्याची तयारी सुरू केली होती. आठ जुलैपासून तिकीट विक्रीस प्रारंभ होणार होता. मात्र, विविध परवानग्या अद्याप मिळालेल्या नसल्याने १७ जुलैपासून सुरू होणाऱ्या विमानसेवेला ‘ब्रेक’ लागला आहे. आता विमानसेवा ऑगस्टमध्ये सुरू होणार आहे. 

जळगाव विमानतळावरून नियमित विमानसेवा सुरू होतच नाही. अनेकवेळा विमानसेवा सुरू होताच काही कारणास्तव बंद पडली. ‘ट्रू-जेट’ कंपनीने १७ जुलैपासून जळगाव ते मुंबई विमानसेवा सुरू करण्याची तयारी पूर्ण केली होती. जळगावमधील उद्योजक, व्यापारी, डॉक्‍टरांची बैठक घेऊन कंपनीनेच ही घोषणा केली होती. त्यात सर्वांनीच नियमित सेवा सुरू होणार असेल तर सुरू करा, असे सांगितले होते. आता मात्र ‘डीजीसीए’ची परवानगी अद्यापही मिळाली नाही. त्याशिवाय विमान सेवा सुरूच होणार नाही.  परवानगीसाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत. मात्र, अद्याप परवानगी न मिळाल्याने ८ जुलैपासून सुरू होणारी तिकीट विक्रीही रद्द करण्यात आली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aeroplane Service Muhurt