Wedding Season : दिवाळीनंतर लग्नाचा वाजेल बॅण्ड; विवाहासाठी यंदा 66 मुहूर्त

wedding season
wedding seasonesakal
Updated on

Wedding Season : तुलसीविवाहनंतर विवाह सोहळ्यांना सुरवात केली जाते. यंदा अधिक मासामुळे दिवाळी लांबल्याने लग्न मुहूर्तही लांबले आहेत. मात्र नोव्हेंबरपासून अनेक मुहूर्त आहेत. विवाह हंगामाचा श्रीगणेशा नोव्हेंबरपासून होईल.

यंदा दिवाळीनंतर नोव्हेंबरमध्ये तीन मुहूर्तांनी लग्नसोहळ्यांना सुरवात होत आहे. (After Diwali 66 wedding muhurat this year dhule news)

नोव्हेंबर २०२३ ते जुलै २०२४ या कालावधीत ६६ लग्न मुहूर्त आले आहेत. मागील वर्षीपेक्षा यंदा मुहूर्त अधिक आले आहेत. ४४ गोरज मुहूर्ताचा वाढवादेखील आला आहे. त्यामुळे दिवाळीनंतर लग्नाचा बॅण्ड वाजणार आहे. मात्र, वैशाखमध्ये लग्न करू इच्छिणाऱ्यांना यंदा या एकही मुहूर्त उपलब्ध नाही.

विवाह मुहूर्ताचा श्रीगणेशा नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात २७, २८, २९ या तारखांना होईल. डिसेंबरमध्ये ६, ८, १५, १७, २०, २१, २५, २६ आणि ३१, तर जानेवारी २०२४ मध्ये २, ६, ८, १७, २२, २७, २९, ३० आणि ३१ या तारखांना विवाह मुहूर्त आहेत. वैशाखात जास्त शुभमुहूर्त आहेत.

wedding season
Wedding Season: लग्नसराईने कष्टकऱ्यांच्या बरकतीला बळ! हाराच्या निर्मितीतून मिळतोय अनेक महिलांना रोजगार

या वर्षी ३ मे २०२४ ते २८ जून २०२४ पर्यंत लग्नासाठी एकही मुहूर्त नाही. त्यामुळे ५६ दिवस मंगल कार्यालये तसेच लग्नकार्याशी संबंधित व्यावसायिकांना झळ सोसावी लागेल. नोव्हेंबर २०२३ ते जुलै २०२४ या कालावधीत लग्नाचे एकूण ६६ मुहूर्त आहेत.

मागील वर्षापेक्षा आठ अधिक मुहूर्त

गेल्या वर्षीपेक्षा यंदा आठ मुहूर्त अधिक आहेत. वधू-वराकडील मंडळींची लगबग सुरू झाली आहे. मंगल कार्यालयांचे बुकिंग करण्याची कामे सुरू आहेत. तसेच काहींना गोरज मुहूर्तावर लग्न करण्याची इच्छा असते, अशांसाठी नोव्हेंबर २०२३ ते जुलै २०२४ मध्ये एकूण ४४ असे मुहूर्त आले आहेत. दिवाळीनंतर लग्नाची धामधूम सुरू होईल.

wedding season
Wedding Season : नोव्हेंबरपासून लग्नाचा धूमधडाका! गतवर्षपिक्षा यंदा 8 मुहूर्त जादा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com