crime
crime

जळगाव : मुलाच्या हत्येनंतर कुटुंबाने घेतला गळफास

भडगाव : गेल्या आठवड्यात खून झालेल्या बालकाच्या आई, वडील व बहीणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. या सामुहीक हत्याकांडाने भडगावात खळबळ उडाली आहे. या कुटुबांने आत्महत्या का केली हे गुलदस्त्यात आहे. 

याबाबत अधिक माहीती अशी की, बब्बु सैय्यद रा. फतेहपुर (उत्तर प्रदेश) ह.मु.टोणगाव हे भडगावात बांगडी बनविण्याचा व्यवसाय करत होते. 21 मार्चला दुपारी चार वाजता त्याचा इसम  वय 9) हा तिसरीत शिकणारा मुलगा गायब झाला होता. त्याचा शोध घेऊन ही तो सापडला नाही. त्यानंतर दुसऱ्या दिवशी 22 मार्चला दुपारी चार वाजेच्या सुमारास त्याचा मृतदेह पाचोरा रस्त्यावरील र.ना.देशमुख महाविद्यालयाच्या शेजारील केळीच्या शेतात आढळून आला होता. त्याचा खुन करण्यात आला होता.

त्याचा पोलिसांकडून तपास सुरू असतानाच आज त्याचे वडील बब्बु सय्यद (वय 48) आई पिंकी बब्बु सय्यद (वय 38) , बहीण नेहा (वय 16) यांनी घरातच गळफास घेऊन सामुहिक आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. सकाळी त्यांनी उशिरापर्यंत दरवाजा न उघडल्याने हे उघड झाले. या तिहेरी आत्महत्येने शहरात खळबळ उडाली आहे. तिघांनी आत्महत्या का केली हे अद्याप समजु शकले नाही. घटनास्थळी पोलिस निरीक्षक धनंजय येरूळे यांनी भेट दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com