
Dhule News : पीडित मुख्याध्यापिकेकडून गुड नाइटचे लिक्विड प्राशन
धुळे : देवपूरमधील मुस्लिमबहुल भागातील एका शाळेत मुख्याध्यापिका आणि शिक्षकांमध्ये दोन ते तीन वर्षांपासून सुरू असलेल्या वादाला मंगळवारी (ता. १०) गंभीर वळण लागले.
शिक्षकाच्या त्रासाला कंटाळून मुख्याध्यापिकेने डासांच्या प्रतिबंधासाठी असलेल्या रासायनिक गुड नाइटचे लिक्विड प्राशन करत सोमवारी रात्री आत्महत्येचा प्रयत्न केला.
ही माहिती समजताच भाजप महिला मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी वादग्रस्त शिक्षकावर कारवार्इच्या मागणीसाठी संबंधित शाळेत आंदोलन केले.(Aggrieved principal Good night liquid Poison drink Agitation by angry BJP Mahila Morcha against teacher Dhule News)
हेही वाचा: Jalgaon News : वाहतुकीचे रस्ते अतिक्रमणाने भरले; पदाधिकारी, नगरसेवकांचाही आशीर्वाद?
पीडित मुख्याध्यापिकेवर चाळीसगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर भाजप महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षा तथा माजी महापौर जयश्री अहिरराव, जिल्हाध्यक्षा मायादेवी परदेशी व अन्य पदाधिकाऱ्यांनी संबंधित शाळेत मंगळवारी शाळेत धडक देत वादग्रस्त शिक्षकावर निलंबनाच्या कारवाईची मागणी केली.
मुख्याध्यापिकेबाबत गंभीर प्रकार घडूनही संबंधित शिक्षण संस्थेने या प्रकरणी दखल न घेतल्याने भाजपच्या महिला आंदोलकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
माजी महापौर अहिरराव यांनी सांगितले, की संबंधित शाळेच्या मुख्याध्यापिकने सोमवारी जिल्हाध्यक्षा परदेशी यांनी भेट घेत कैफियत मांडली. मुख्याध्यापिकेला जिल्हाध्यक्षा परदेशी यांनी धीर दिला.
हेही वाचा : या महामार्गामुळं खरंच येईल 'समृद्धी'?
हेही वाचा: Nashik News : दुभाजकीवर दुचाकी आदळून 2 तरुण ठार; एक गंभीर
त्यामुळे भाजपच्या महिला पदाधिकारी संबंधित शाळेत दाखल झाल्या. मुख्याध्यापिकेला त्रास देणाऱ्या शिक्षकावर संस्थेने अद्याप कारवाई का केली नाही, असा प्रश्न आंदोलक महिलांनी उपस्थित केला. शाळेतीलच शिक्षक महिलेला सतत त्रास देतो. तिच्याकडे शरीरसुखाची मागणी करतो. ही निंदनीय व निषेधार्थ बाब आहे. त्याची संस्थेने दखल घेतली पाहिजे होती.
वादग्रस्त शिक्षकावर गुन्हा दाखल झाल्यानंतर तो जामिनावर सुटला आहे. त्यानंतरही त्याने मुख्याध्यापिकेला तिच्या घरी जात धमकी दिली. जामीन मिळाल्याने पोलिस माझे काही करू शकले नाही, मी बाहेर आलो, त्यामुळे तुझी आता खैर नाही, अशी धमकी त्याने मुख्याध्यापिकेला दिली.
त्यामुळे मुख्याध्यापिकेने गुड नाइटचे लिक्विड प्राशन करत आत्महत्येचा प्रयत्न केला. वादग्रस्त शिक्षकावर कठोर कारवाई होत नाही, तोपर्यंत भाजप महिला मोर्चा स्वस्थ बसणार नाही, असेही आंदोलक माजी महापौर अहिरराव, सौ. परदेशी, नगरसेविका प्रतिभा चौधरी, किरण कुलेवार, सारिका अग्रवाल, आरती पवार, वंदना भामरे आदींनी सांगितले.
हेही वाचा: Municipal Corporation News : आयुक्त नियुक्तीची सुनावणी पुढे ढकलली