Nashik News : दुभाजकीवर दुचाकी आदळून 2 तरुण ठार; एक गंभीर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

2 killed one injured in a road accident in nashik city

Nashik News : दुभाजकीवर दुचाकी आदळून 2 तरुण ठार; एक गंभीर

नाशिक : सिटी सेंटरजवळ दुभाजकावर दुचाकी आदळून दोन ठार तर एक गंभीर झाल्याची घटना मध्यरात्री घडली. सिटी सेंटर मॉलनजीक मंगळवारी (ता. १०) मध्यरात्री दुचाकी (क्रमांक. ६२०४) वरील चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने दुभाजकावर जाऊन आदळली. यात दुचाकीवर दोन जण जागीच ठार तर एक गंभीर झाला.

हेही वाचा: Nashik News : उद्यानातील खेळण्या चोरट्यांकडून लंपास; मृत्युंजय महादेव मंदिर उद्यानाची दुरवस्था!

अपघात स्थळी पोलिस पथक व रुग्णवाहिका आली. रस्त्यावर मृतांच्या रक्ताचा सडा पडलेला होता. मृतांना जिल्हा रूग्णालयात तर जखमीस खासगी रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले.

मृत व जखम हे नंदूरबार जिल्ह्यातील रहिवासी असून ते सध्या श्रमिक नगरात राहत असल्याचे पोलिसांनी सांगितले. यात मृतांचे आडनाव मराठे तर जखमीचे नाव हर्षद असल्याचे घटनास्थळी सांगण्यात आले.

हेही वाचा: Nashik Fraud Crime : सेल्स एक्झिक्युटिव्हने लावला कंपनीला 5 लाखांना चुना!

टॅग्स :Nashikaccidentdeath