येवला - अनकाई गावाला ट्रँकर सुरु न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 एप्रिल 2018

येवला : एकदा नव्हे तर दोनदा अनकाई गावाला टँकरने पाणीपुरवठा करण्याचा प्रस्ताव दिला तरीही प्रशासन म्हणजेच जिल्हाधिकाऱ्यांनी टँकर सुरू करण्याकडे कानाडोळा केला आहे. गावाला दोन महिन्यांपासून भिषण पाणीटंचाईने ग्रासले असल्याने सरपंच गावाला स्वखर्चातुन टँकरने पाणी पुरवत आहे. आता दोन दिवसात प्रशासनाने गावाला पाणी ट्रँकर सुरु न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा सरपंचांसह ग्रामस्थांनी दिला आहे. 

येवला : एकदा नव्हे तर दोनदा अनकाई गावाला टँकरने पाणीपुरवठा करण्याचा प्रस्ताव दिला तरीही प्रशासन म्हणजेच जिल्हाधिकाऱ्यांनी टँकर सुरू करण्याकडे कानाडोळा केला आहे. गावाला दोन महिन्यांपासून भिषण पाणीटंचाईने ग्रासले असल्याने सरपंच गावाला स्वखर्चातुन टँकरने पाणी पुरवत आहे. आता दोन दिवसात प्रशासनाने गावाला पाणी ट्रँकर सुरु न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा सरपंचांसह ग्रामस्थांनी दिला आहे. 

अल्प पावसामुळे येथील सामुदायिक विहिरीचे पाणी सप्टेंबर महिन्यापर्यंत गावाला पुरले होते. सन २००३ - २००४ मध्ये यशवंत ग्राम समृद्धी योजनेतुन विहिर करण्यात आली असून या विहिरीवर हातपंप बसविण्यात आले आहे. या विहिरीच्या पाण्यावर जानेवारीपर्यंत गावाला पुरविण्यात आले.

जानेवारी अखेरीस भिषण पाणी टंचाई गावात निर्माण झाल्याने पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थ गेल्या दोन महिन्यापासून व्याकुळ झालेले आहेत.पाणीच उपलब्ध होत नसल्याने सरपंच प्रतिभा वैद्य या स्वखर्चातुन आठवड्याला दोन ते तिन वेळा ट्रँकरने पाणीपुरवठा करत आहेत. येवला येथून ट्रँकरने पाणी आणून प्रत्येकी २२०० रुपये खर्च ट्रँकरसाठी सरपंच वैद्य यांना स्वत: करावा लागत आहेत. 

येथे टंचाई जाणवु लागताच ग्रामपंचायतीने पंचायत समितीला पाणी ट्रँकरचा प्रस्ताव सादर केला होता.मात्र जिल्हाधिकरी कार्यालयाने पाणी ट्रँकरचा प्रस्ताव नाकारला होता. पुन्हा फेब्रुवारी महिन्यात ग्रामपंचायतीने दुसर्‍यांदा पाणी ट्रँकरचा प्रस्ताव सादर केला होता.मात्र अजूनही जिल्हाधिकारी कार्यालयाने पाणी ट्रँकरच्या प्रस्तावाला मंजुरी न दिल्याने हाल होत आहे. दरवर्षी मे महिन्यात गावाला पाणी ट्रॅकरची गरज लागत असताना यंदा जानेवारी महिन्यातच पाणी टंचाई निर्माण झाल्याने ग्रामस्थांची पाण्यासाठी वणवण सुरु आहे.

येत्या दोन दिवसात प्रशासनाने पाणी ट्रँकर सुरु न केल्यास सरपंच प्रतिभा वैद्य,उपसरपंच राजाराम पवार, ग्रामपंचायत सदस्य डॉ. सुधीर जाधव, दिपाली वैद्य, बेबीताई परदेशी, अशोक बोराडे, निवृत्ती घुमरे, सुर्यभान गांगुर्डे, नगिनाताई कासलीवाल, कमलबाई आहिरे, राहुल देवकर आदींसह ग्रामस्थांनी तीव्र आंदोलन छेडण्यासह रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला आहे. 

"ग्रामस्थ भीषण टंचाईचा सामना करत असताना जिल्हाधिकार्‍यांनी पाणी ट्रँकर सुरु न करणे म्हणजे अधिकाराचा हा मोठा गैरवापरच आहे. ग्रामस्थ पिण्याच्या पाण्यासाठी व्याकुळ झालेले असताना जिल्हाधिकार्‍यांची भुमिका घेतली ती निषेधार्य आहे. दोन दिवसात ट्रँकर सुरु न झाल्यास ग्रामस्थांच्या संतापाचा पारा नक्कीच चढलेला दिसेल., असे अनकाई गावचे माजी सरपंच डॉ. सुधीर जाधव यांनी सांगितले.

Web Title: agitation if there is no supply of tanker in ankai yeola