नाशिक - राज्य शासनाच्या विरोधात कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचे आंदोलन

राजेंद्र बच्छाव
गुरुवार, 5 एप्रिल 2018

इंदिरानगर (नाशिक) : राज्य शासनाच्या विरोधात कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेमार्फ़त12वीच्या उत्तर पत्रिका विभागीय मंडळात जमा न करण्याच्या आंदोलनातील शिक्षकांनी आज नाशिक विभागीय मंडळ कार्यालयात खडा पहरा देत सकाळी 7 नंतर एकही उत्तर पत्रिका जमा होऊ दिली नाही.

इंदिरानगर (नाशिक) : राज्य शासनाच्या विरोधात कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेमार्फ़त12वीच्या उत्तर पत्रिका विभागीय मंडळात जमा न करण्याच्या आंदोलनातील शिक्षकांनी आज नाशिक विभागीय मंडळ कार्यालयात खडा पहरा देत सकाळी 7 नंतर एकही उत्तर पत्रिका जमा होऊ दिली नाही.

आज येथे 10 वी चे बीजगणित विषयाचे नियामक उत्तरपत्रिका जमा करण्यासाठी येत होते. त्यांना देखील कागदपत्रे बघूनच आंदोलक आत सोडत होते. पेपर तपासणी बहिष्कार आंदोलनात दिलेली आश्वासने शासनाने पाळली नाहीत. संबंधित मान्य केलेल्या मागण्यांचे आदेश काढले नाहीत. त्यामुळे आता हे आदेश जोपर्यंत निघत नाहीत तो पर्यंत तपासलेल्या उत्तर पत्रिका आणि गुणपत्रिका नियामक मंडळात जमा करणार नाहीत.

महासंघाचे आंदोलन आता अधिक तीव्र झाले आहे. आज नजरचुकीने आलेल्या शहादा, नंदुरबार पेठ येथील नियामकांना संघटनेच्या आक्रमकतेपुढे नमते घ्यावे लागले व आल्यापावली उत्तरपत्रिकासहित परत जावे लागले. संबंधित नियामकांना याेग्य समज देण्यात आली.

संघटनेचे पदाधिकारी सकाळी दहा वाजता येतात म्हणून नियामकांनी सकाळी नऊ वाजता किंवा आधी या असे निराेप बाेर्डाकडून देण्यात आले म्हणून संघटनेचे पदाधिकारी व सदस्य सकाळी सात वाजेपासून बाेर्डात हजर हाेते. उद्यापासून आंदोलन संपेपर्यंत संघटनेचे पदाधिकारी सकाळी सात वाजेपासून बाेर्डात हजर राहणार आहे.त्यामुळे काेणीही नियामकांनी बाेर्डात जावू नये. असे आवाहन करण्यात आले आहे. जिल्हा संघटनेकडून विभागीय उपसचिव व्ही एम् कदम यांना निवेदन देण्यात आले. यावेळी प्रा.संजय शिंदे, आर.एन.शिंदे, व्ही.एम्.चव्हाण, प्रा.बी.ए.पाटील, प्रा. डी. पी. पाटील, अनिल महाजन आदी उपस्थित होते.

Web Title: agitation of junior college teachers against state government