धुळे: शहरात चौफेर नियमानुसार सोयीची पर्यायी जागा न देता विक्रेता हटाव मोहिमेविरोधात भाजी- फळ विक्रेते, हॉकर्सधारकांनी शुक्रवारी (ता. १) कडकडीत विक्री बंद आंदोलन करत महापालिकेवर मोर्चा काढला. त्यात विक्रेता हटाव मोहीम राबविण्यात येत असलेला जुन्या आग्रा रोड सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (पीडब्ल्यूडी) अखत्यारित आहे.