जळगावात कृषी विद्यापीठ निर्मितीस तत्त्वतः मान्यता

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 फेब्रुवारी 2019

भुसावळ - 'नाथाभाऊ, गिरीश महाजन, हरिभाऊंच्या पाठपुराव्यातून साकारत असलेल्या मेगारिचार्ज प्रकल्पाने जिल्ह्याचे भाग्य बदलेल,' असा विश्‍वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज व्यक्त केला. राहुरी कृषी विद्यापीठाचे विभाजन करून जळगाव जिल्ह्यात विद्यापीठ निर्मितीस तत्त्वतः मान्यता देण्यात येत असल्याची घोषणाही त्यांनी केली.

भुसावळ येथे विविध विकासकामांचे लोकार्पण व खासदार रक्षा खडसे यांनी साडेचार वर्षांत केलेल्या विकास कामासंदर्भात "समर्पण' या पुस्तिकेचे प्रकाशन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले, त्याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी मंत्री एकनाथराव खडसे होते. मुख्यमंत्र्यांनी या वेळी रक्षा खडसे यांच्या कामाचे कौतुक केले.

Web Title: Agriculture University temporary permission devendra fadnavis