पुरुषोत्तमनगर- कधीकाळी आषाढ महिन्यात आकाशात ढग दाटून यायचे. आता मात्र पावसाचा काही नेम राहिलेला नाही. निसर्गचक्र झपाट्याने बदलतेय. त्याचबरोबर शेतकऱ्याचं आयुष्यही. हवामान बदलाचा थेट परिणाम आता केवळ जागतिक चर्चेपुरता राहिलेला नाही. तो थेट शेतकऱ्यांच्या बांधावर आणि त्याच्या दररोजच्या संघर्षात दिसत आहे. मे महिन्यातील पावसाची हजेरी त्याचेच एक उदाहरण म्हणावे लागेल.