"नाईट लॅंडिंग'सह अन्य सेवांसाठी प्रयत्न सुरू  : उन्मेष पाटील 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 15 नोव्हेंबर 2019

जळगाव : येथील विमानतळावर "नाईट लॅंडिंग'सह हवामानविषयक तंत्रज्ञान, प्रवासी सेवेसह मालवाहतूक सेवा लवकरात लवकर सुरू व्हावी, अशा विविध बाबींचा आढावा खासदार उन्मेष पाटील यांनी आज घेतला. 
विमानतळ सल्लागार समितीची बैठक आज दुपारी उन्मेष पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बैठकीस समितीचे सदस्य तथा उद्योजक प्रेम कोगटा, भरत अमळकर, अप्पर जिल्हाधिकारी डॉ. नंदकुमार बेडसे, विमानतळ प्राधिकरणाचे अधिकारी आदी उपस्थित होते. 

बैठकीत प्रामुख्याने विमानाचे नाईट लॅंडिंग, हवामानविषयक अद्ययावत तंत्रज्ञान बसविणे तसेच येणाऱ्या काही काळात प्रवासी क्षमता वाढविण्यासह मालवाहतूक सुरू करण्यासंबंधी विषयांवर विस्तृत चर्चा झाली. या तीनही विषयांबाबत खासदार पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केली. 

"नाईट लॅंडिंग' सुविधा लवकरच 
जळगाव विमानतळावर "नाईट लॅंडिंग'ची सुविधा नाही. ती उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने उपाययोजना करण्यासंदर्भात प्रस्ताव तसेच हवामानविषयक यंत्रणा उभारण्याबाबत आराखडा तयार करण्याच्या सूचना खासदारांनी दिल्या. त्यांनी यासंदर्भात नागरी उड्डयण मंत्रालयाच्या संयुक्त सचिवांशीही मोबाईलवर संपर्क करून चर्चा केली. 

प्रवासी व मालवाहतूक सुविधा 
प्रवासी क्षमता अधिक असलेल्या विमानसेवेसह जळगाव जिल्हा व खानदेशातून विमानाद्वारे मालवाहतूक सुरू करण्यासंबंधी सुविधेबाबतही या बैठकीत चर्चा झाली. त्यामुळे बैठकीतील ठरलेल्या तिघा विषयांबाबत पाठपुरावा करून त्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करू, असे खासदारांनी "सकाळ'शी बोलताना सांगितले. समिती सदस्यांनीही यावेळी आपापली मते मांडली. 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: airport jalgaon night landing unmesh patil