अजवा खजुर मिळतेय 1100 रुपये प्रति किलोने!

Ajawa Khajur get 1100 rupees per kilo in ramadan month
Ajawa Khajur get 1100 rupees per kilo in ramadan month

येवला : मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजान पर्वाला प्रारंभ झाला असून रमजान ईद येईपर्यंत सर्वांचेच उपवास सुरू आहे. या उपवासाच्या निमित्ताने दररोज सायंकाळी उपवास सोडण्यासाठी आवश्यक असलेले फळे थंड पेय व इतर खाद्यपदार्थांचा मीना बाजार येथील मुस्लिम बहुल भागातील देवी खुंटावर रोज बहरत आहे.

येथे विविध खाद्यपदार्थ विक्रीला असून असंख्य प्रकारच्या खजूर येथे उपलब्ध आहे. यातील अजवा या प्रकाराची खजूर तर एक हजार 100 रुपये किलो दराने विक्री होताना दिसते. शहरात मुस्लिम बांधवांची संख्या मालेगाव पाठोपाठ सर्वाधिक असल्याने येथे रमजानची मोठी धुम असते.

यानिमित्ताने देवी खुंट भागात भरणारा मीना बाजार हा मुस्लिम बांधवांसह खवय्ये असलेल्या हिंदूंसाठी देखील पर्वणीच ठरत आहे. या बाजारात लाखो रुपयांची उलाढाल रोज होत असून नानाविध प्रकारच्या खाद्यपदार्थांनी या बाजाराने लक्ष वेधले आहे. तब्बल 29 दिवस हा बाजार चालतो. रमजान रोजे सुरु झाल्यापासून म्हणजे 7 मे पासून सुरू झालेला हा बाजार 5 जूनपर्यंत चालणार आहे. त्यानंतर सहा जूनला रमजान ईद असल्याने पाच जूनला या बाजारात खाद्यपदार्थांसह कपड्यांची देखील रेलचेल दिसेल. मुस्लिम बांधवांचा उपवास सायंकाळी सात वाजेनंतर संपतो. उपवास सोडण्यासाठी विशेषतः खजूर आवश्यक असल्याने बाजारात 150 ते 1100 रुपये किलो दराची खजूर विक्रीला आहे. याशिवाय ब्रेड, नान, शेवया, सुतारफेणी, खमंग, कचोरी, जिलबी, ​खजूर, टरबूज, आंबे आदी थंडपेय असे सर्व पदार्थ येथे विक्रीला आहेत. 

साधारणतः दुपारी अडीच वाजल्यापासून सुरू होणारा हा बाजार सायंकाळी साडेसहा वाजेपर्यंत चालतो. चारवाजे नंतर मात्र प्रचंड गर्दीने हा बाजार बहरून गेलेला असतो. घरोघर उपवास सोडण्यासाठी येथून खरेदी होत असल्याने लाखो रुपयांची उलाढाल या बाजारातून होत असून मोठी गर्दी खरेदीला होत आहे. 

“नाज पठण करणे, रोजा (उपवास) पकडणे, कुराण वाचणे अशाप्रकारे रमजान साजरा केला जात असून रमजानच्या नित्तिाने बाजारपेठा बहरल्या आहेत. प्रत्येक मुस्लिम बांधवांच्या कुटुंबात प्रसन्नतेचे वातावरण निर्माण झाले आहे. मुस्लीम बांधव खजूर खाऊन रोजा सोडत असल्याने असंख्य प्रकारच्या खजूर विक्रीला आल्या असून 1100 रुपयांपर्यंत दराची खजूर यावेळी बाजारात आली आहे.”
- कौसर सय्यद, येवला  

“येथील मीना बाजारात विविध खाद्यपदार्थांच्या रेलचेलबरोबरच खरेदीसाठी विविध साहित्य दाखल झाले आहे. खजुराबरोबरच शाकाहारी, मासाहरी खाद्यपदार्थ विक्रीसाठी आले आहेत. शहरातील देवी खुंट, जुनी कचेरी रोड,
नागड दरवाजा आदी भागात दुपारनंतर सायंकाळी रोजा सोडण्याच्या वेळेपर्यंत खरेदीला उधाण येत आहे.”
- अकमल शेख, येवला

 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com