अजित पवारांनी शेतकऱ्यांशी केली बैलगाडीत चर्चा

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 16 एप्रिल 2017

जळगाव जिल्ह्यातील पाळथीत 60 बैलगाड्यांचा सहभाग
विरोधी पक्षातर्फे शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी संघर्ष यात्राचा दुसरा टप्पा काल (ता. 15) पासून सिंदखेंडराजा (जि. बुलढाणा) येथे राजमाता जिजाऊ यांच्या जन्मस्थळाला अभिवादन करून सुरू झाला.

जळगाव  : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसह विरोधी पक्षातर्फे काढण्यात आलेली संघर्ष यात्रेत पाळधी (जि. जळगाव) येथे 60 बैलगाड्यांचा सहभाग होता. बैलगाडीत बसून माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, अर्थमंत्री जयंत पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनजंय मुंडे, आमदार शशिकांत शिंदे यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला, तसेच त्यांचे निवेदन स्वीकारले.

विरोधी पक्षातर्फे शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी संघर्ष यात्रेचा दुसरा टप्पा काल (ता. 15) पासून सिंदखेंडराजा (जि. बुलढाणा) येथे राजमाता जिजाऊ यांच्या जन्मस्थळाला अभिवादन करून सुरू झाला. राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते धनजंय मुंडे, आमदार शशिकांत शिंदे, दिलीप वळसे-पाटील, समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी, 'रिपाइं'चे जोगेंद्र कवाडे आदी यात सहभागी झाले आहे. रात्री ही यात्रा जळगाव येथे मुक्कामी होती. सकाळी 9 वाजता जळगावातून धुळ्याकडे ही यात्रा रवाना झाली.

रस्त्यात पाळधी येथे यात्रेत विरोधी पक्षाच्या नेत्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला, यावेळी तब्बल 80 बैलगाड्यांचा सहभाग होता. अजित पवार, जयंत पाटील, शशिकांत शिंदे आदीनी बैलगाडीत बसून जनतेला अभिवादन केले. यावेळी त्यांनीं शेतकऱ्यांशी संवादही साधला. त्यांच्या व्यथाही जाणून घेतल्या, यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे एरंडोल तालुकाध्यक्ष भटेश्‍वर पाटील, प्रा. एन.डी. पाटील, माजी जि.प. सदस्य रवींद्र भिलाजी पाटील, रमेश माणिक पाटील आदी कार्यकर्त्यानी स्वागत केले. यावेळी मोठ्या प्रमाणावर नागरिक उपस्थित होते. पुढे ही यात्रा एरंडोलकडे रवाना झाली.

Web Title: ajit pawar talks with farmers in bullock cart in sangharsh yatra