अजित पवारांनी घेतले अनिल पाटील यांना गाडीत

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 20 जानेवारी 2019

जळगाव - जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे उमेदवारीसाठी अनेकांच्या नावांची चर्चा सुरू आहे. अमळनेरचे माजी जिल्हा परिषद सदस्य अनिल भाईदास पाटील यांची उमेदवारीही निश्‍चित असल्याचे सांगितले जात आहे. त्यातच पक्षाचे नेते व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अनिल पाटील यांना स्वतःहून आपल्या गाडीत बसवून घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. 

‘परिवर्तन निर्धार’यात्रेच्या निमित्ताने माजी उपमुख्यमंत्री अजित पवार जळगावात आहेत. आज आकाशवाणी चौकातील राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. पत्रकार परिषद संपल्यानंतर पवार हे ॲड. रवींद्र पाटील यांच्या मातोश्रींचे निधन झाल्याने त्यांचे सांत्वन करण्यासाठी निवासस्थानी रवाना झाले. त्यावेळी अनिल भाईदास पाटील हे आपल्या वाहनातून निघालेले असतानाच अजित पवार यांनी त्यांना बोलावून आपल्या सोबत चालण्यास सांगितले, 

Web Title: Ajit Pawar took Anil Patil in the car