भिलाली केटीवेअरसाठी शेतकऱ्यांनी केले मुंडन

amalner
amalner

अमळनेर : भिलाली (ता. पारोळा) येथे कोल्हापूर पद्धतीचा बंधारा साकारला जात आहे. मात्र, 85 टक्के काम झाले असून, 15 टक्केच काम शिल्लक आहे. हे काम शासनाच्या उदासीनतेमुळे रेंगाळले आहे. हे काम त्वरीत व्हावे यासाठी शेतकऱ्यांनी बंधाऱ्यावर तीन दिवसांपासून गुराढोरांसह उपोषण सुरु केले आहे. आज दुपारी शेतकऱ्यांनी मुंडन करून तिव्र शब्दात शासनाचा निषेधही केला. 

भिलाली येथे बोरी नदीवर सुमारे 250 हेक्टर सिंचन क्षमतेचा बंधारा तयार होत आहे. 2014 मध्ये तत्कालीन आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील यांनी या बंधाऱ्यास सुमारे साडेतीन कोटी रूपायांची मंजुरी मिळवून कामही मार्गी लावले. या निधीत 85 टक्के काम होऊन उर्वरित 15 टक्के काम बंद पडले. त्यानंतर काम सुरू होण्यासाठी शेतकऱ्यांनी तीन वेळा उपोषण केले. याची दखल घेत या कामासाठी विद्यमान आमदार शिरीष चौधरी यांनी सुमारे साडे दहा कोटींची सुधारित प्रशासकीय मान्यताही मिळवली आहे.  मात्र, यास दोन महिने  उलटूनही कामास अद्याप सुरवात झालेली नाही. 'हत्ती गेला अन शेपूट राहिले' अशी अवस्था बंधाऱ्याची झाली आहे. परिणामी शेतकऱ्यांनी 20 फेब्रुवारीपासून बंधाऱ्यावर बैलगाडे व जनावरांसह उपोषण सुरू केले. आज तिसऱ्या दिवशी 20 जणांनी मुंडन करून शासनाचा निषेध केला. 'बंधारा झालाच पाहिजे' आशा जोरदार घोषणा दिल्या. मात्र, अद्याप त्यांची कोणीही दखल घेतलेली नाही. 

यांनी केले मुंडन
शिवाजी पाटील, दत्तूराव पाटील, शरद पाटील, भटू पाटील, रवींद्र पाटील, कैलास पाटील, रंगा भिल, पंकज पाटील, नानाभाऊ पाटील आदींनी मुंडन केले. 

हे आहेत उपोषणकर्ते
सरपंच अनिता भिल, उपसरपंच शीतल पाटील, सतीश पाटील, दीपक पाटील, पंढरीनाथ पाटील, गोकुळ पाटील, डॉ. पांडुरंग पाटील, झुंबर पाटील, डॉ. चेतन पाटील आदींसह शेकडो शेतकरी, ग्रामस्थ व महिलांचा समावेश आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com