esakal | संशयिताला पकडताना झाली झटापट...त्यात वरिष्ठ पोलिस निरीक्षकाचेच मात्र....
sakal

बोलून बातमी शोधा

police nashik.jpg

अंबड पोलिस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी (ता. 30) दारू पिऊन गाडी चालवणाऱ्या 28, तर मंगळवारी (ता. 31) 15 चालकांवर पोलिसांनी कारवाई केली. या सर्वांच्या गाड्या जमा केल्याने अंबड पोलिस ठाण्याला जणू काही वाहन बाजाराचे स्वरूप प्राप्त झाले होते.

संशयिताला पकडताना झाली झटापट...त्यात वरिष्ठ पोलिस निरीक्षकाचेच मात्र....

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नाशिक : काही दिवसांपूर्वी दिव्या ऍडलॅब येथील हाणामारीतील फरारी संशयित शिवाजी चौकात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. मंगळवारी (ता. 31) रात्री अकराच्या सुमारास अंबडचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक कुमार चौधरी, गुन्हे शाखाचे उपनिरीक्षक राकेश शेवाळे व पोलिस पथक शिवाजी चौकात दाखल झाले.

असे घडले सर्व...

संशयिताची ओळख पटल्याने त्याला पकडत असताना झालेल्या झटापटीत श्री. चौधरी यांच्या उजव्या पायाला मार बसून त्यांच्या पायाचे हाड फ्रॅक्‍चर झाले. अशा परिस्थितीत पोलिसांनी रचलेल्या सापळ्यामुळे संशयिताला पकडण्यात पोलिसांना यश आले. दरम्यान, अंबड पोलिस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी (ता. 30) दारू पिऊन गाडी चालवणाऱ्या 28, तर मंगळवारी (ता. 31) 15 चालकांवर पोलिसांनी कारवाई केली. या सर्वांच्या गाड्या जमा केल्याने अंबड पोलिस ठाण्याला जणू काही वाहन बाजाराचे स्वरूप प्राप्त झाले होते. पोलिस उपायुक्त विजय खरात, सहाय्यक आयुक्त मंगलसिंग सूर्यवंशी यांनी परिसरातील ठिकठिकाणी असलेल्या नाकेबंदीला भेट देऊन कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी कारवाई करण्याचे पोलिसांना आदेश दिले. ठिकठिकाणी टोळक्‍याने उभे असलेल्या तरुणांवरही पोलिसांनी कारवाई केली. 

हेही वाचा > छतावरुन आत्महत्या करण्यासाठी पाऊल पुढे टाकणार....तेवढ्यातच..

हेही वाचा > पं.स.निवडणुकीत शिवसेनेने राष्ट्रवादीला 'इथे' दाखविला ठेंगा!

loading image
go to top