छतावरुन आत्महत्या करण्यासाठी पाऊल पुढे टाकणार....तेवढ्यातच..

सकाळ वृत्तसेवा 
Monday, 30 December 2019

प्रयास हॉस्पिटलशेजारील इंद्रायणी अपार्टमेंटच्या छतावर चढून दुपारी रूपाली उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न करीत होती. छतावरून भिंतीवर बसून तिने बाहेर पाय काढले होते. बघ्यांनी ही घटना नजीकच्या रहिवाशांना सांगितली. नंतर घटनास्थळी मोठी गर्दी झाली.

नाशिक : मालेगाव येथील कॅम्प- सोयगाव कॉलेज रोडवरील इंद्रायणी अपार्टमेंटच्या छतावरून उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या रूपाली भरत लोंढे (वय 17) तरुणीला महापालिका अग्निशमन दलाच्या जवानांनी बोलण्यात गुंतवून ठेवून शिताफीने तिचे प्राण वाचविले. सोमवारी (ता. 30) दुपारी हा प्रकार घडला. घरगुती किरकोळ वादातून की अन्य कारणावरून या तरुणीने आत्महत्येचा प्रयत्न केला, हे मात्र समजू शकले नाही. 

असा घडला प्रकार...

प्रयास हॉस्पिटलशेजारील इंद्रायणी अपार्टमेंटच्या छतावर चढून दुपारी रूपाली उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न करीत होती. छतावरून भिंतीवर बसून तिने बाहेर पाय काढले होते. बघ्यांनी ही घटना नजीकच्या रहिवाशांना सांगितली. नंतर घटनास्थळी मोठी गर्दी झाली. तहसीलदार चंद्रजित राजपूत, पोलिस व महापालिका अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने छतावर धाव घेत तरुणीला आत्महत्येपासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तरुणी ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती.

हेही वाचा > PHOTO : भाजप नगरसेविकेचा मृत्यू....मृत्यूबाबत वेगवेगळे तर्क

अग्निशमन दलाचे अधीक्षक संजय पवार, जवान अमोल जाधव, संदीप सुळे, सत्यजित अहिरे, जमील अन्सारी यांनी छतावर असतानाच तिला बोलण्यात गुंतविले. त्याचवेळी एकाने झडप घेऊन तिला वाचविले. नंतर उपस्थितांनी सुटकेचा निःश्‍वास टाकला. तरुणीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न का केला, हे गुलदस्त्यातच आहे. अग्निशमन दल व पोलिसांनी घटनेची नोंद केली आहे.

हेही वाचा > ...यामुळे तीन दिवसांच्या तान्हया बाळाला सोडून आई..."माता न तू वैरिणी"

हेही वाचा > चलती है क्या ?'तिला रिक्षात बसण्याचा इशारा केला..अन् त्यावेळीच..


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fire Brigade rescues young girl's life at malegaon Nashik marathi news