Ambedkar Jayanti 2023 : डॉ. आंबेडकरांच्या पदस्पर्शाने धुळे पावन; हस्ताक्षराचा अनमोल ठेवा!

Dr. Ambedkar
 and Rajendra Hostel Dr. Ambedkar's handwriting.
Dr. Ambedkar and Rajendra Hostel Dr. Ambedkar's handwriting. esakal

Ambedkar Jayanti 2023 : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती (Dhule news) शुक्रवारी (ता. १४) साजरी होत आहे. भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १९३७ मध्ये धुळे दौरा केला होता. (Ambedkar Jayanti 2023 Dr Babasaheb Ambedkar visited dhule 1937 dhule news)

त्यांच्या या पदस्पर्शाने धुळे पावन झाले. शहरातील दौऱ्यावेळी डॉ. आंबेडकर यांनी ज्या काही संस्थांना भेटी दिल्या, तेथील भेट पुस्तिकेतील त्यांच्या हस्ताक्षरातील अभिप्राय ऐतिहासिक, अनमोल ठेवा ठरले आहेत. यासंबंधी स्मृती, आठवणी ८६ वर्षांनंतरही पुन्हा ताज्या झाल्या आहेत.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ऐतिहासिक आठवणीतील एक सुवर्णपान खानदेशच्या नावेही कोरले गेले आहे. ते १९३७ व १९३८ ला धुळ्यात आल्याची नोंद आहे. ही भावना आज ८६ वर्षांनंतरही तितकीच ताजी आणि रोमांचकारी ठरते आहे.

याचा जुन्या पिढीला जसा अभिमान आणि जिव्हाळा आहे, तितकाच तो नव्या पिढीलाही आहे. धुळे दौऱ्यातील डॉ. आंबेडकरांच्या काही ऐतिहासिक आठवणी केवळ दलित समाजासाठीच नव्हे, तर परिवर्तनवादी वाटेवरच्या प्रत्येकासाठी गौरवशाली, अभिमानास्पद आणि प्रेरणादायी आहेत.

डॉ. आंबेडकर यांचा धुळे दौरा का?

धुळे जिल्हा न्यायालयातील तत्कालीन नामवंत वकील ॲड. प्रेमसिंग आनंदसिंग तवर-पाटील यांनी डॉ. आंबेडकरांना एका दाव्याच्या युक्तिवादासाठी धुळ्यास येण्याचे आग्रही निमंत्रण दिले. याच सुमारास लळिंग येथील डॉ. आंबेडकरांचे अनुयायी पी. एल. लळिंगकर यांनी आपल्या लळिंग गावास भेट द्यावी, असा आग्रह आंबेडकरांकडे धरला.

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

Dr. Ambedkar
 and Rajendra Hostel Dr. Ambedkar's handwriting.
Dam Water Supply: पाणीपुरवठा करणारी धरणे धोकादायक; तपासणीसाठी धरण सुरक्षा कक्ष स्थापन करण्याच्या सूचना

त्यानुसार ॲड. तवर आणि लळिंगकरांच्या आग्रहाखातर लळिंगला भेट देता येईल, असा विचार डॉ. आंबेडकरांनी केला आणि तसे पत्र त्यांनी ॲड. प्रेमसिंग तवर यांना पाठविल्याची स्मृती त्यांचे नातू व विद्यमान धुळे जिल्हा सरकारी वकील देवेंद्रसिंह योगेंद्रसिंह तवर यांनी आज पुन्हा ताजी केली.

याशिवाय डॉ. आंबेडकरांना धुळ्यातील नामांकित धर्मतत्त्वचिंतक महामहोपाध्याय श्रीधर शास्त्री पाठक यांच्या ‘अस्पृश्‍यतेला शास्त्राधार नाही’ या ग्रंथासंबंधी व श्रीधर शास्त्रींच्या प्रतिपालनाविषयी अधिक स्पष्टीकरण हवे होते.

तसेच धुळ्यातील राजवाडे संशोधन मंडळाच्या कार्याविषयीही जिज्ञासा, राजेंद्र छात्रालयाविषयी माहिती जाणणे, दलित समाजाच्या शैक्षणिक उन्नतीसाठी झटणाऱ्या कार्यकर्त्यांविषयी आस्था असल्याने डॉ. आंबेडकरांनी धुळे भेटीचा निर्णय घेतला. त्यानुसार ते ३१ जुलै ते २ ऑगस्ट १९३७ पर्यंत धुळे दौऱ्यावर होते.

दर्शनासाठी जनसमुदाय अन्‌ भाषण

डॉ. आंबेडकर यांच्या निर्देशांनुसार ॲड. तवर यांनी त्यांच्या तीनदिवसीय मुक्कामाची व्यवस्था लळिंग येथील वन विभागाच्या निसर्गरम्य लांडोर बंगल्यात केली होती. तेथे मोठा जनसमुदाय डॉ. आंबेडकरांच्या दर्शनासाठी एकत्रित झाला होता. या समुदायापुढे डॉ. आंबेडकरांनी पंधरा मिनिटे भाषण दिले.

Dr. Ambedkar
 and Rajendra Hostel Dr. Ambedkar's handwriting.
RTE Admission : आरटीईअंतर्गत प्रवेशासाठी जिल्ह्यातून 4 हजार 750 विद्यार्थ्यांची निवड

ते म्हणाले होते, ‘‘आया, बहिणींनो, समाजबांधवांनो, तुमची कितीही हलाखीची स्थिती असली तरी गरिबीच्या नरकातून बाहेर पडण्यासाठी शिक्षणाची कास धरा. मुलाबाळांना शाळेत पाठवा. झाडपाला, चारा विका, अथवा मोळ्या विका. पण आपल्या मुला-मुलींना शाळेत पाठवायचे विसरू नका. कारण शिक्षणाशिवाय आपल्याला तरणोपाय नाही.’’

संस्थांना भेटी आणि‌ हस्ताक्षराचे जतन

डॉ. आंबेडकरांनी राजेंद्र छात्रालयाचे संस्थापक अध्यक्ष काकासाहेब विनायक नरहर बर्वे यांच्या आग्रहाखातर धुळ्यातील नेहरू चौक परिसरातील राजेंद्र छात्रालयास ३१ जुलै १९३७ ला भेट दिली होती. त्यानंतर १७ जून १९३८ ला बाबासाहेब धुळ्यात आले होते. १९ जूनपर्यंत ते येथे असल्याचे सांगितले जाते. त्यातील १८ जूनला त्यांनी येथील राजवाडे संशोधन मंडळाला दिलेल्या भेटीची नोंदही आढळून येते.

त्यातील अभिमान डॉ. आंबेडकरांचे हस्ताक्षर पाहून आजही फुलतो. ३१ जुलै १९३७ ला राजेंद्र छात्रालय व १८ जून १९३८ ला राजवाडे संशोधन मंडळाला दिलेल्या भेटीदरम्यान डॉ. आंबेडकरांनी भेट पुस्तिकेत लिहिलेले संदेश आजही पाहता येतात.

हा ऐतिहासिक दस्तऐवज या दोन्ही संस्थांनी जतन करून ठेवला आहे. ३१ जुलैच्या अविस्मरणीय आठवणीतून लळिंग किल्ल्यावरील लांडोर बंगल्यातील डॉ. आंबेडकरांचे वास्तव्य हे आता खऱ्या अर्थाने स्मृतिस्थळ बनले आहे. दर वर्षी ३१ जुलैला येथे ‘भीमस्मृती यात्रा’ भरत असते.

Dr. Ambedkar
 and Rajendra Hostel Dr. Ambedkar's handwriting.
Dr. Ambedkar Jayanti : शहरातील वाहतूक मार्गामध्ये बदल; मिरवणुकीवर पोलिसांची करडी नजर

धुळ्यातील मार्गदर्शनाची एक आठवण

डॉ. आंबेडकरांनी १७ जून १९३८ ला मनोहर थिएटरजवळील म्युनिसिपल शाळा क्रमांक पाचच्या आवारात आपल्या समाजबांधवांसमोर भाषण केले. स्वतंत्र मजूर पक्षाच्या वाटचालीसह आपल्या राहणीमानाचा दर्जा उंचवा, स्वाभिमानाने जीवन जगा, मुलांना शिकवा अशा अनेक विषयांवर त्यांनी मार्गदर्शन केल्याचे काही पुस्तकातील नोंदीतून समजते.

राजेंद्र छात्रालयाच्या भेटीतील संदेश...

राजेंद्र छात्रालयातील भेट पुस्तिकेतील अभिप्रायात डॉ. आंबेडकर म्हणतात, ‘मि. बर्वे मला येथे घेऊन आले. वसतिगृहात २२ विद्यार्थी असल्याचे त्यांनी सांगितले. मला येण्याची संधी मिळाली आणि त्यामुळे मी आनंदित आहे. मला सांगायलाही आनंद होतो, की वसतिगृहातील जागा स्वच्छ आणि व्यवस्थित होती. या ठिकाणी जातिभेद दिसून आला नाही, ही प्रकर्षाने जाणवणारी गोष्टही पाहायला मिळाली.’

राजवाडे मंडळाच्या भेटीतील संदेश...

राजवाडे संशोधन मंडळाच्या भेटपुस्तिकेतील अभिप्रायात डॉ. आंबेडकर म्हणतात, ‘मी युरोप अमेरिकेतील ग्रंथालयामध्ये जवळपास सहा-सात वर्षे खर्च केली. राजवाडे संशोधन मंडळातील हस्तलिखिते आणि पेंटिंग्ज पाहून मी खूप भारावलो. युरोपियन ग्रंथालयांच्या तुलनेत ही जागा अर्थातच खूप छोटी आहे, पण तरीही ज्यांनी या संस्थेला जन्म दिला त्यांची जबाबदारी वाखाणण्याजोगी आहे. मला आशा आहे की नवीन सरकार या संस्थेकडे विशेषकरून लक्ष देईल. संस्थेच्या भरभराटीस शुभेच्छा!’

Dr. Ambedkar
 and Rajendra Hostel Dr. Ambedkar's handwriting.
Dr. Ambedkar Jayanti : मिरवणुकीवर ड्रोनची निगराणी; पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com