RTE Admission : आरटीईअंतर्गत प्रवेशासाठी जिल्ह्यातून 4 हजार 750 विद्यार्थ्यांची निवड

rte news
rte newssakal

RTE Admission : बालकांच्या मोफत आणि सक्तीच्या शिक्षण अधिनियमांतर्गत (आरटीई) नाशिक जिल्हयात ४ हजार ७५० विद्यार्थ्यांची निवड यादी जाहीर झाली असून, प्रतीक्षा यादीही जाहीर करण्यात आली आहे. (Selection of 4 thousand 750 students from district for admission under RTE nashik news)

४ हजार ८५४ पैकी ४ हजार ७५० विद्यार्थ्यांची निवड झालेली असल्याने १०४ जागा रिक्त ठेवण्यात आल्या आहेत. दरम्यान जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागास अद्याप यादी प्राप्त झालेली नाही.

नाशिकमधील ४०१ शाळांत प्रवेशासाठी ४ हजार ८५४ जागा उपलब्ध असून त्यासाठी तब्बल २२ हजार १२२ अर्जांची नोंदणी झाली आहे. ही प्रक्रिया झाल्यानंतर ५ एप्रिलला सोडत जाहीर काढण्यात आली. १२ एप्रिलला लॉटरीद्वारे निवड झालेल्या बालकांच्या पालकांना त्यांनी अर्जामध्ये नमूद केलेल्या मोबाईल नंबरवर दुपारी चारनंतर निवडीचा मेसेज आला.

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

rte news
BJP Press Conference : वसंतस्मृती कार्यालयाचा होणार विस्तार; शहराध्यक्षपदी पालवे कायम

जिल्हयातील पात्र ४०१ शाळांमध्ये यंदा आरटीईच्या ४ हजार ८५४ जागा उपलब्ध आहेत. परंतु, यादी मात्र ४ हजार ७५० जागांसाठी जाहीर केली आहे. उर्वरित १०४ जागांवरील प्रवेशासाठी विद्यार्थ्यांनी अर्जच केलेले नसल्याची माहिती प्राथमिक शिक्षण विभागामार्फत देण्यात आली.

एसएमएस प्राप्त झाल्यानंतर पालकांनी १३ ते २५ एप्रिल २०२३ या कालावधीत पंचायत समिती / महानगरपालिका स्तरावरील पडताळणी समितीकडे जाऊन कागदपत्रे तपासून घेऊन आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करावा. पडताळणी समितीने प्रवेश निश्चित केल्यानंतर पालकांनी ३० एप्रिलपर्यंत शाळेमध्ये जाऊन बालकाचा प्रवेश घ्यावा.

rte news
Nashik NMC News : महापालिकेच्या 35 वाहनांचा परवाना रद्द

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com