Railway News
Railway News sakal

Railway News : मुंबई-नागपूर दुरंतो एक्स्प्रेसला एक अतिरिक्त वातानुकूलित तृतीय डब्बा

मध्य रेल्वे कडून ३१ मार्च २०२४ पर्यंत तात्पुरत्या स्वरुपात मुंबई-हजरत निजामुद्दीन राजधानी एक्स्प्रेस आणि मुंबई-नागपूर दुरंतो एक्स्प्रेसला एक अतिरिक्त वातानुकूलित तृतीय डब्बा जोडण्यात येत आहे.

शेगाव ,बुलढाणा : मध्य रेल्वे कडून ३१ मार्च २०२४ पर्यंत तात्पुरत्या स्वरुपात मुंबई-हजरत निजामुद्दीन राजधानी एक्स्प्रेस आणि मुंबई-नागपूर दुरंतो एक्स्प्रेसला एक अतिरिक्त वातानुकूलित तृतीय डब्बा जोडण्यात येत आहे. मध्य रेल्वेने आता या गाड्या कायमस्वरूपी अतिरिक्त वातानुकूलित तृतीय डब्ब्यासह चालवण्याचा निर्णय घेतला आहे:

गाडी क्रमांक: 22221 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- हजरत निजामुद्दीन राजधानी एक्स्प्रेस छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दि. ०१.०४.२०२४ पासून चालवण्यात येईल.गाडी क्रमांक: 22222 हजरत निजामुद्दीन - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस -राजधानी एक्स्प्रेस हजरत निजामुद्दीन दि. ०२.०४.२०२४ पासून चालवण्यात येईल.

Railway News
Buldhana News : महसूल विभागाकडून क्लिन चिट ; कर्मचाऱ्यांसह अधिकारी हतबल

गाडी क्रमांक: 12289 नागपूर- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दुरांतो एक्स्प्रेस नागपूर दि. ०१.०४.२०२४ पासून चालवण्यात येईल. गाडी क्रमांक: 12290 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस -नागपूर दुरांतो एक्सप्रेस छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दि. ०२.०४.२०२४ पासून चालवण्यात येईल. तरी या सुविधेचा प्रवाशांनी लाभ घ्यावा आणि ट्रेनमध्ये बसण्यापूर्वी त्यांच्या तिकिटांची स्थिती तपासावी.असे आवाहन करण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com