Nandurbar News : अंगणवाडी सेविकांच्या संपामुळे बोरद येथे बालकांची दिनचर्या चुकली

अंगणवाडीसेविकांच्या बेमुदत संपामुळे येथील नऊ अंगणवाड्यांना कुलूप लागले होते. त्यामुळे या अंगणवाड्यांमधील ८१६ लाभार्थी दैनंदिन पोषण आहारापासून वंचित होते.
Children attending Anganwadi taking advantage of nutrition.
Children attending Anganwadi taking advantage of nutrition.esakal

Nandurbar News : अंगणवाडीसेविकांच्या बेमुदत संपामुळे येथील नऊ अंगणवाड्यांना कुलूप लागले होते. त्यामुळे या अंगणवाड्यांमधील ८१६ लाभार्थी दैनंदिन पोषण आहारापासून वंचित होते. मात्र सध्या आठवड्याभरापासून संप स्थगित झाल्याने अंगणवाड्या पूर्ववत सुरू झाल्या, मात्र अंगणवाडीतील बालकांची दिनचर्या चुकल्याने अंगणवाड्यांमधील उपस्थिती रोडावली आहे.

अंगणवाडीसेविकांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देऊन त्यांना वेतनश्रेणी लागू करण्यात यावी, या मागणीसाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी ४ डिसेंबर २०२३ पासून बेमुदत संप पुकारला होता. (Anganwadi workers strike disrupts childrens routine in Borad nandurbar news)

हा संप २५ जानेवारीपर्यंत २०२४ पर्यंत चालला होता. संपाला बरेच दिवस उलटले तरी राज्य सरकार अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य करीत नसल्याने अंगणवाड्यांना कुलूप होते.

तळोदा तालुक्यातील बोरद ही मोठी ग्रामपंचायत असल्याने या गावांमध्ये एकूण नऊ अंगणवाड्या असून, नऊ अंगणवाड्यांमध्ये सुमारे ६५२ विद्यार्थी पोषण आहाराचा लाभ घेत होते. अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा संप सुरू असल्याने या संपाला बरेच दिवस उलटले होते.

तेवढ्या दिवसांपासून या अंगणवाड्यांमध्ये प्रवेशित असलेली लहान बालकेही पोषण आहारापासून वंचित होती. प्रत्येक अंगणवाडीत सुमारे ७२ ते ७५ मुले आहेत. या मुलांचा आहार अनेक दिवसांपासून मिळत नसल्यामुळे पालकांमध्येही नाराजीचा सुरू होता.

विद्यार्थ्यांबरोबरच गर्भवती, स्तनदा मातांसाठी अमृत आहार योजनादेखील शासनातर्फे सुरू आहे. अशा ६७ गर्भवती स्त्रिया तसेच स्तनदा माता या ठिकाणी या योजनेचा लाभ घेत आहेत. त्यांनादेखील संपाचा फटका बसला होता आणि त्यामुळे त्याही या लाभापासून वंचित होत्या.

Children attending Anganwadi taking advantage of nutrition.
Nandurbar News : कळंबूत निधीअभावी शाळेची जागा भग्नावस्थेत; जि.प. शाळेचे निर्लेखन

अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या या संपाला २५ जानेवारीला स्थगिती देण्यात आली. अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा सुरू असलेल्या संपादरम्यान महिला आणि बालविकास सचिव यांच्या कक्षात बैठक पार पडली. यानंतर संपाला तूर्त स्थगिती देण्यात आली.

मानधनवाढीसह अन्य मागण्यांसाठी पुकारण्यात आलेल्या हा संप स्थगित करण्यात आल्याने २६ जानेवारीपासून राज्यातील सर्व अंगणवाडी कर्मचारी कामावर रुजू झाले आहेत; परंतु गेल्या दीड महिन्यापासून सुरू असलेल्या संपामुळे बालकांची दररोज अंगणवाडीत येण्याची दिनचर्या चुकली आहे.

अंगणवाडीमध्ये येण्यासाठी बालके सध्या तयार नाहीत, अशा बालकांना व त्यांच्या पालकांना समजावून अंगणवाडीमध्ये पाठविण्याबाबत अंगणवाडीसेविका घरोघरी जाऊन समजूत काढत पालकांनी बालकांना अंगणवाडीत पाठविण्याची विनंती करीत आहेत.

मात्र लवकरच बोरद परिसरातील अंगणवाड्या बालकांच्या किलबिलाटाने गजबजणार असल्याचा विश्‍वास अंगणवाडीसेविकांनी व्यक्त केला आहे.

Children attending Anganwadi taking advantage of nutrition.
Nandurbar News : शहाद्यात साडेचार हजार कोटींच्या विकासकामांचे भूमिपूजन

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com