Vidhan Sabha 2019 : आमदारकीसाठी अनिल गोटेंचा चौथ्यांदा उमेदवारी अर्ज

Anil Gote filed nomination for vidhansabha election fourth time
Anil Gote filed nomination for vidhansabha election fourth time

धुळे : धुळे शहर विधानसभा मतदारसंघात तीन वेळेस आमदार राहिलेले अनिल गोटे यांनी चौथ्यांदा उमेदवारी अर्ज भरण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी त्यांच्यासह समर्थकांची खंडेराव महाराज मंदिरापासून दर्शनानंतर मिरवणूक सुरू झाली आहे. 

दोन वेळा अपक्ष, तिस-यावेळी म्हणजेच गेल्या निवडणुकीत भाजप तर्फे गोटे निवडून आले. मात्र, येथील महापालिका निवडणुकीच्या नेतृत्वावरून गोटे व जलसंपदामंत्री गिरीश महाजन, खासदार डाॅ. सुभाष भामरे, पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांच्यात टोकाचा संर्घष निर्माण झाला. या वादानंतर गोटे यांनी आमदारकीचा राजीनामा दिला. तो मंजूर झाला. या स्थितीमुळे गोटे यांनी स्व- संस्थापक असलेल्या लोकसंग्राम संघटनेतर्फे यंदा उमेदवारी अर्ज भरण्याचा निर्णय घेतला आहे.

मिरवणुकीत माजी नगराध्यक्षा हेमा गोटे व समर्थक सहभागी आहेत. मी एकतर्फी विजयी होणार असल्याचे गोटे यांनी मिरवणुकीवेळी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com