माझ्याविरूध्द खोटा गुन्हा, खडसेंनी केली न्यायालयाची फसवणूक: दमानिया 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 20 जून 2018

बँकेच्या डि.डि.ची खोटी प्रत तयार करून त्या चोरीला गेल्याचा बनाव केला. या प्रकरणी माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी पोलीस व न्यायालयाचीही फसवणूक केली आहे. माझ्या विरूध्द खोटा गुन्हा दाखल केला असून या प्रकरणी पोलिसांनी खडसेंवर कारवाई करावी. अशीं मागणी सामाजिक कार्यकर्त्या अजंली दमानिया यांनी पत्रकार पत्रकार परिषदेत केली. 

जळगाव - बँकेच्या डि.डि.ची खोटी प्रत तयार करून त्या चोरीला गेल्याचा बनाव केला. या प्रकरणी माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी पोलीस व न्यायालयाचीही फसवणूक केली आहे. माझ्या विरूध्द खोटा गुन्हा दाखल केला असून या प्रकरणी पोलिसांनी खडसेंवर कारवाई करावी. अशीं मागणी सामाजिक कार्यकर्त्या अजंली दमानिया यांनी पत्रकार पत्रकार परिषदेत केली. 

जिल्हा पत्रकार संघाच्या दालनात आज आयोजित पत्रकार परिषद त्या बोलत होत्या. यावेळी, गजानन मालपुरे व रोहिनी राऊत हे उपस्थित होते. पुढे बोलतांना दमानिया म्हणाल्या कि, खडसेंनी मुक्ताईनगर पोलिस स्टेशनला दबाव टाकून खोटा गुन्हा दाखल केला. या प्रकरणी मुंबईत गुन्हा दाखल करायचा होता. पोलिसही त्यांच्याच दबावाखाली आपला जबाब घेण्यासाठी मुंबईत आले होते. दाखल केलेला हा गुन्हा न्यायालयाची दिशाभूल करणारा आहे. त्यामुळे खडसेंची आमदारकी रद्द करण्याचे पत्र सभापतीना लिहीणार असल्याचे त्यांनी सांगितले.

खडसे यांनी आपण प्यादे असल्याचे म्हटले असून यामागे मंत्री असल्याचा आरोप केला. परंतू मंत्री गिरीश महाजन हे जळगाव जिल्ह्याचे एकमेव मंत्री असून त्यांच्याकडून एकही कागद मी घेतला नाही. मंत्री गिरीश महाजनही भ्रष्टाचारी असून त्यांनी जळगावातील एस.टी. महामंडळाच्या जमीनीचा मोठा गटाच्या व्यवहारात खटोड यांच्या माध्यमातून गैरव्यवहार केला आहे. आपण भुजबळांविरूध्दही लढाई केली आहे. दोन्ही नेत्यांचे अस्तित्व संपत आहे. त्यामुळे ते एकत्र आले आहे. असे दहा खडसे आणि भुजबळ एकत्र आले तरी त्यांना आपण पुरून उरणार. 
भोसरी जमीन प्रकरणी खडसेंना देण्यात आलेल्या क्‍लिनचिट बाबत त्या म्हणाल्या की, सरकारने खडसेंना घाबरून क्‍लिन चिट दिली आहे. भाजप जिल्ह्यात संपत आहे, त्यामुळे पक्ष वाचविण्यसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी ही क्‍लीनचिट दिली आहे. 
भ्रष्टाचाराविरूध्द लढतो म्हणून आपला छळवाद सुरू आहे. आपण हा लढा स्वत:साठी नव्हे तर जनतेसाठी लढत आहोत. आपल्याला लढ्यात साथ द्यावी असे अवाहन करत असताना त्यांना गहिवरुन आले.

Web Title: anjani damaniya takes press conference in jalgoan