‘अंत्योदय एक्‍स्प्रेस’ चाळीसगावलाही थांबणार

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 18 मार्च 2017

जळगाव - नव्याने सुरू होणाऱ्या अंत्योदय एक्‍स्प्रेस रेल्वेगाडीला चाळीसगाव स्थानकावर थांब्यासाठी खासदार ए. टी. पाटील यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी या थांब्याला मान्यता देत नव्या गाडीच्या वेळापत्रकात बदल केला आहे. खासदार पाटील यांनी लक्ष घालून करवून घेतलेल्या या बदलामुळे जिल्ह्यातील विशेषत: चाळीसगाव भागातील प्रवाशांसाठी मोठी सुविधा उपलब्ध झाली आहे. 

लोकमान्य टिळक टर्मिनस ते टाटानगर ही अंत्योदय एक्‍स्प्रेस (क्र.१२८८५/१२८८६) रेल्वेगाडी उद्या (१८ मार्च) सुरू होत आहे. रेल्वेमंत्री प्रभू मुंबईच्या लोकमान्य टिळक टर्मिनस स्थानकातून या गाडीला हिरवा झेंडा दाखवतील. या रेल्वेगाडीला जळगाव, चाळीसगाव व पाचोरा येथे थांबा मिळावा, अशी मागणी खासदार पाटील यांनी केली होती. मात्र, रेल्वे प्रशासनाने ही सुपरफास्ट गाडी असून, इगतपुरीनंतर भुसावळ येथेच थांबेल, असे स्पष्ट केले होते. मात्र, खासदार पाटील यांनी आपला आग्रह सोडला नाही. अखेर रेल्वेमंत्री प्रभू यांनी हस्तक्षेप करून रेल्वेथांब्यांची लांबी लक्षात घेता चाळीसगाव येथे थांबा मंजूर करावा, असे निर्देश दिले. त्यामुळे आता जळगाव जिल्ह्यातील जनतेला लांबपल्ल्याच्या रेल्वेगाडीसाठी चाळीसगाव येथे आणखी एक थांबा मिळाला आहे. पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त ही नवी रेल्वेगाडी सुरू होत आहे. 

‘अंत्योदय एक्‍स्प्रेस’ला चाळीसगाव येथे थांबा दिल्याबद्दल रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांचे आभार. रेल्वेमंत्र्यांसमवेत ‘विदर्भ एक्‍स्प्रेस’ला पाचोरा येथे व ‘नवजीवन एक्‍स्प्रेस’ला धरणगाव येथे थांबा देण्याबाबत निवेदन दिले आहे. या मागणीचा पाठपुरावा करून रेल्वेमंत्र्यांकडून त्यालाही मंजुरी मिळवू. 
- ए. टी. पाटील,खासदार, जळगाव

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: antyoday express stop in chalisgav