गंगाधरीचा परिसर होतोय वृक्षमय 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 25 जून 2018

नांदगाव - कल्पकतेला विधायक कृतिशीलतेची जोड दिली की काय घडू शकते याची प्रचिती सध्या गंगाधरीतले ग्रामस्थ अनुभवत आहेत. अन हे सर्व घडले ते गोरख जाधव या वस्तीशाळेच्या उमद्या व प्रयोगशील शिक्षकामुळे..   

नांदगाव - कल्पकतेला विधायक कृतिशीलतेची जोड दिली की काय घडू शकते याची प्रचिती सध्या गंगाधरीतले ग्रामस्थ अनुभवत आहेत. अन हे सर्व घडले ते गोरख जाधव या वस्तीशाळेच्या उमद्या व प्रयोगशील शिक्षकामुळे..   

आदर्श गाव कृती समितीचे गोरख जाधव समन्वयक आहेत. त्यामुळे वृक्ष संवर्धन व त्यासंबधातील जागृतीचा दृश्य परिणाम आता दिसू लागला आहे. २००७ पासून वृक्षारोपण व संवर्धनाचे काम करत असलेल्या त्यांच्या या उपक्रमशीलतेचा परिणाम म्हणजे आता गंगाधरी गावाचा परिसर वृक्षमय होत आहे. या वर्षी देखील बीज रोपणाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला यात पळस, सिताफळ, खैर, बाभुळ, करवंद, कवठ, रामकाठी बाभुळ, आपटा, बहावा, अंजन, आंबा, फणस, बेल, जांभूळ, सुळबाभूळ, बोर, शेवरी आदी झाडांच्या 3000 बियांची लागवड व वाटप करण्यात येणार आहे. या बीज रोपणामुळे शासनाच्या एकच लक्ष तेरा कोटी वृक्ष यामोहिमेसाठी मदत होणार आहे. तसेच यामुळे परिसरात जनजागृती होऊन वृक्ष रोपण व संवर्धनाचे महत्व नागरिकामध्ये वाढत आहे. 

या मोहिमेमुळे स्थानिक बेरोजगारांना काही प्रमाणात रोजगार उपलब्ध होतो. बीज लागवडीबरोबरच शेतकरी बांधवांना उपयोगी असे चारा देणारे व फळ झाडांच्या बियांचे वाटप पावसाळा भर करण्यात येते. तसेच या कालावधीत पळसाच्या बियांची लागवड मोठ्या प्रमाणात करण्यात येणार आहे. वनीकरणासाठी पळस फार उपयोगी झाड आहे 

उन्हाळ्यात परिसरात काही झाडांच्या बियांचे संकलन केले जाते. काही बियांणे परगाववरुन खरेदी केले. गोरख जाधव यांनी दिली आज झालेल्या बीज रोपणाच्या मोहिमेत जगन्नाथ जाधव, हिराबाई जाधव, विमलबाई जाधव, गोरख जाधव, मीना जाधव, अनिता गायकवाड, कु. वैभव जाधव, कु.अंकिता जाधव, कु. संध्या जाधव, रेणुका शिंदे, कु.शुभम जाधव असा सगळा जाधव परिवार सहभागी झाला शनिवार, रविवार असे सलग दोन दिवस हा कार्यक्रम संपन्न झाला.
 

Web Title: The area surrounding the Gangadhari is being grown