प्लॅस्टिक बॉटल प्रदुषण रोखण्यासाठी सप्तश्रृंगी गडावर बॉटल क्रशिंग मशीनची व्यवस्था

दिगंबर पाटोळे
रविवार, 17 जून 2018

वणी (नाशिक) :  सप्तश्रृंगी गडावर प्लॅस्टिक बाटल्यांच्या वाढत्या प्रदूषणावर उपाय म्हणून रोटरी क्लब ऑफ नाशिक (ग्रेप सिटी)  सप्तश्रृंग गडावर बॉटल क्रशिंग मशीन बसविले असून क्रशिंग मशीनचे लोकार्पन सोहळा शनिवारी संपन्न झाला. 

वणी (नाशिक) :  सप्तश्रृंगी गडावर प्लॅस्टिक बाटल्यांच्या वाढत्या प्रदूषणावर उपाय म्हणून रोटरी क्लब ऑफ नाशिक (ग्रेप सिटी)  सप्तश्रृंग गडावर बॉटल क्रशिंग मशीन बसविले असून क्रशिंग मशीनचे लोकार्पन सोहळा शनिवारी संपन्न झाला. 

सप्तश्रृंगी गडावर येणाऱ्या भाविकांची संख्या लाखोंच्या घरात आहे.देवीचे मंदिर उंच डोंगरावर असल्याने भाविकांकडून पाणी पिण्यासाठी प्लॅस्टिक बॉटलचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. प्लॅस्टिक मुक्ती व ग्रामस्वच्छते बाबत प्रशासनान  गंभीरतेने दखल घेतली आहे. याबाबत गेल्या आठ महिन्यांपासून देवस्थान ट्रस्ट व ग्रामपंचायत प्रशासनाने प्लस्टिक बंदी करुन स्वच्छतेसाठी खाजगी ठेकेदाराची नियुक्ती केली आहे. गडावर दररोज येणारे हाजारो भाविक पिण्याच्या पाण्यासाठी बाटली आणतात किंवै स्थानिक व्यावसायिकांकडून प्लॅस्टिक बॉटल खरेदी करतात. व वापर झाल्यावर त्या बॉटल रस्त्यावर फेकतात. सप्तश्रृंग गड परिसर झाडाझुडुपांमध्ये,वनराई ने विखुरलेला असल्याने त्या बाटल्या हवेने उडतात व सर्वत्र पसरतात. प्लॅस्टिक प्रदूषण यामुळेच वाढते.त्यावर जालीम उपाय शोधून काढण्यासाठी देवस्थान ट्रस्ट च्या पदाधिकारी वर्गाने रोटरी क्लब च्या माध्यमातून क्रशिंग मशीन उपलब्द करून घेतले आहे.  

बॉटल क्रशिंग होऊनही निर्माण होणाऱ्या मटेरियल चा प्रश्न आहेच. म्हणून नाशिक महापालिका प्रशासनाकडून त्यांच्या ऊर्जा युनिटला हे मटेरियल कामात येणार असल्याने त्याची वाहतूक महापालिका करणार आहे. गडावरील भाविकांची गर्दी पहाता हे चार ते पाच मशिनची आवश्यकता आहे. मात्र हा छोटासा प्रयत्न देखील महत्वाचा ठरतो. पर्यावरण पूरक शास्त्रोक्त पद्धतीने या बाटल्यांची विल्हेवाट लावली गेल्याने प्रदूषणावर नियंत्रण येऊन सप्तश्रृंगी गड परिसर स्वच्छ राखण्यात सुलभता येणार आहे.  दरम्यान रोटरी क्लब ऑफ नाशिक ( ग्रेप सिटी) यांंनी क्रशिंग मशीन सप्तश्रृंगी देवस्थान ट्रस्टच्या ताब्यात देवूून आज ता. १६ न्यासाच्या भक्तशाळा कार्यालयाजवळ मशिनचा लोकार्पन साेहळा संपन्न झाला. यावेळी रोटरीच्या अध्यक्षा अलका सिंग, सचिव ज्योतिका पै, जनसंपर्क संचालक जयंत खैरनार, माजी अध्यक्षा आशा वेणूगोपाळ, देवस्थान ट्रस्ट विश्वस्त उन्मेष गायधनी, व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे, कार्यकारी अधिकारी भगवान नेरकर, जनसंपर्क अधिकारी भिकन वाबळे, सरपंच सुमन सुर्यवंशी, उपसरपंच राजेश गवळी, सदस्य गिरीश गवळी, गणेश बर्डे, न्यासाच्या कार्यालयातील विविध विभाग प्रमुख, कर्मचारी उपस्थित होते.

निसर्गरम्य श्री सप्तश्रृंगी गडा परीसरात प्रदुषणास घातक ठरणाऱ्या प्लॅस्टिक बाटली रस्त्यावर व इतरत्र फेकुन न देता भाविक व स्थानिक हॉटेल व्यवसायीकांनी क्रशींग मशिनचा वापर करुन बाटलीची विल्हेवाट लावावी असे आवाहन सप्तश्रृंगी ट्रस्टच्यावतीने करण्यात आले आहे

Web Title: Arrangement of bottle crushing machine at Saptashrungi fort to prevent plastic bottle pollution