पोलीस आयुक्तालयातील लाचखोर लिपिकास अटक 

3arrested_54.jpg
3arrested_54.jpg

नाशिक : निलंबित करण्यात आलेल्या पोलीस कर्मचाऱ्याकडून 15 हजार रुपयांच्या लाचेची रक्कम स्वीकारणाऱ्या पोलीस आयुक्तालयातील लिपिकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहाथ अटक केली. अनिल पुंडलिक माळी (55, रा. सी-विंग, अर्णव सोसायटी, अयोध्यानगरी, त्रिकोणी बंगल्याजवळ, हिरावाडी, पंचवटी, नाशिक) असे आस्थापना विभागातील लाचखोर वरिष्ठ लिपिकाचे नाव आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सदरची कारवाई आज सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास केली. 

तक्रारदार निलंबित पोलीस कर्मचारी असून त्यांच्याविरोधात विभागीय चौकशी सुरू आहे. सदरील चौकशीसंदर्भात सकारात्मक अहवाल देण्यासंदर्भात तक्रार आस्थापना विभागातील वरिष्ठ लिपिक अनिल माळी यांच्याकडे गेले होते. त्यासंदर्भात लाचखोर माळी याने सोमवारी (ता.26) तक्रारदाराकडे 20 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तडजोडी अंती 15 हजार रुपये देण्याची निश्‍चित झाले होते. तक्रारदाराने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सत्यता पडताळून पाहिल्यानंतर आज (ता.27) सकाळी पोलीस आयुक्तालयात सापळा रचला होता. 

तक्रारदार लाचेची 15 हजार रुपयांची रक्कम घेऊन पोलीस आयुक्तालयात आला. त्याने लाचखोर माळी यांच्याशी संपर्क साधला असता त्याने कॅन्टीन शेजारील स्वच्छतागृहात भेटण्याचे ठरले. त्याप्रमाणे, ते दोघे स्वच्छतागृहात भेटले आणि त्याचठिकाणी तक्रारदाराकडून संशयित लाचखोर माळी याने लाचेची 15 हजार रुपयांची रक्कम स्वीकारली. त्यानंतर दबा धरून असलेल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने लाचखोरास रंगेहाथ अटक केली. याप्रकरणी सरकारवाडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. लाचखोर वरिष्ठ लिपिक सेवानिवृत्तीच्या जवळ होता. तर तक्रारदार निलंबित पोलीस कर्मचारी असून त्याच्यावरही दोन गुन्हे दाखल आहेत आणि त्याबाबतच विभागीय चौकशीही सुरू आहे.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com