दरोड्याच्या तयारीत असलेली टोळी ताब्यात

daroda.jpg
daroda.jpg

नाशिक : मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर दरोड्याच्या तयारीत बसलेल्या टोळीला वाहनासह धुळे एलसीबीने (ता.९) ऑक्टोबरला रात्री ताब्यात घेतले. त्यांच्याकडून गावठी पिस्तुल, काडतुसे, मिरची पूड व नायलॉन दोर असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

 विधानसभा निवडणुकीसाठी लावलेले एसएसटी पॉईंट तपासत असताना महामार्गावर नीला हॉटेलसमोरून सेंधव्याकडे भरधाव जाणाऱ्या मारुती इको व्हॅनचा पथकाला संशय आला. निरीक्षक हेमंत पाटील यांच्या पथकातील उपनिरीक्षक अनिल पाटील, हवालदार सुनील विंचुरकर, संदीप थोरात, प्रभाकर बैसाने, मनोज पाटील, चेतन कंखरे, योगेश जगताप, केतन पाटील, महेश मराठे यांनी मारुती व्हॅन चा पाठलाग केला. दहिवद फाट्यावर व्हॅन (एमपी 09 डब्ल्यूबी 4098) थांबवण्यात पोलिसांना यश आले. 

पोलिसांकडून मुद्देमाल जप्त
वाहन चालकाने उडवाउडवीची उत्तरे दिल्याने पोलिसांचा संशय बळावला. त्यांनी व्हॅनची झडती घेतल्यावर गावठी बनावटीचे पिस्तूल, दोन काडतुसे, मिरची पावडर व नायलॉनचा दोर असा मुद्देमाल आढळला. व्हॅनमधील संशयित चेतन किशोर धामणे, सिद्धार्थ राजेश धामणे, रोहित किशोर धामणे (सर्व रा. सेंधवा), सजन बगड्या डावर (रा. जामली ता. सेंधवा) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. एक संशयित नरेश बाटा मात्र फरार झाला. शिरपूर पोलिसात संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्व संशयित 18 ते 22 वयोगटातील आहेत. ते दरोड्याच्या उद्देशाने महामार्गावर टेहळणी करीत असल्याचा संशय आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com