निवृत्त पोलिस उपनिरीक्षक अरविंद देवरे यांना राष्ट्पतिपदक

दीपक कच्छवा
बुधवार, 28 मार्च 2018

मेहुणबारे पोलिस ठाण्याचे निवृत्त पोलिस उपनिरीक्षक श्री. देवरे यांना राज्यापाल विद्यासागर राव व  पोलीस महानिरीक्षक सतीश माथुर यांच्या उपस्थितीत अरविंद देवरे यांना गुणवत्तापुर्ण सेवा राष्ट्पतिपदक देण्यात आले.

मेहुणबारे (ता.चाळीसगाव) : राज्य पोलिस दलात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या मेहुणबारे पोलिस ठाण्याचे निवृत्त पोलीस उपनिरीक्षक अरविंद देवरे यांना राज्यपाल विद्यासागर राव यांच्या हस्ते मुंबईत  राष्ट्पतिपदक देवुन सन्मानीत करण्यात आले.

मेहुणबारे पोलिस ठाण्याचे निवृत्त पोलिस उपनिरीक्षक श्री. देवरे यांना राज्यापाल विद्यासागर राव व  पोलीस महानिरीक्षक सतीश माथुर यांच्या उपस्थितीत अरविंद देवरे यांना गुणवत्तापुर्ण सेवा राष्ट्पतिपदक देण्यात आले. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी  घरफोडी,चोरी तसेच गंभीर गुन्ह्याची उकल करून महत्वपूर्ण  तपास लावला आहे. त्यांच्या या कामकाजात त्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत तिनशे बक्षीस मिळवली आहेत. त्यांनी पोलिसात 39 वर्ष सेवा बजावली, मेहुणबारे पोलीस ठाण्यातुन 31 जुलै 2017 मध्ये सेवानिवृत्त झाले.त्यांना प्राप्त झालेल्या या  पदकाची घोषणा 15 ऑगस्ट 2016 मध्ये झाली  होती.आज त्यांना प्रत्यक्षात  राष्ट्पतिपदक प्रदान करण्यात आले.

Web Title: Arvind Devre president medal