पावसाळ्यापूर्वी आश्रमशाळा दुरुस्ती करा

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 30 एप्रिल 2017

आदिवासी विकास विभागाच्या समितीकडून आढावा
नाशिक - राज्यातील सर्व शासकीय आश्रमशाळांची दुरुस्ती पावसाळ्यापूर्वी करण्याचे आदेश आदिवासी विकास विभागामार्फत राज्यातील सर्व अप्पर आदिवासी आयुक्तांना देण्यात आले आहेत.

राज्यात आदिवासी विकास विभागांतर्गत चालणाऱ्या 529 शासकीय आश्रमशाळांपैकी मोजक्‍या आश्रमशाळा सोडल्या, तर अनेक आश्रमशाळांतील पायाभूत सुविधांची स्थिती अतिशय खराब आहे. अनेक शाळांच्या भिंती पडण्याच्या स्थितीत असून, दरवाजे, खिडक्‍या मोडल्या आहेत. स्वच्छतागृहे बंद आहेत. पिण्याच्या पाण्याची सोय नाही. सर्वत्र अस्वच्छता आहे. त्यामुळे पावसाळा सुरू होण्यापूर्वी सर्व आश्रमशाळांची दुरुस्ती करण्याचे आदेश आदिवासी विकास विभागाने बजावले आहेत. शासकीय आदिवासी आश्रमशाळांसह आवश्‍यक अशा अनुदानित आश्रमशाळांनादेखील आपापल्या स्तरावर दुरुस्तीचे आदेश शाळा व्यवस्थापन विभागास दिले आहेत. "वॉश' उपक्रमांतर्गत आवश्‍यक सर्व सोयी-सुविधा आश्रमशाळांमध्ये राबविण्याचेही आदेश देण्यात आले आहेत. आश्रमशाळांमध्ये सुरू असलेल्या या कामांचा आढावा घेण्यासाठी समित्यांची स्थापना केली आहे.

Web Title: ashramshala repairing before rainy season