अटल, तुझे येवला जाना है और जानाही पडेगा...!

संतोष विंचू
शुक्रवार, 17 ऑगस्ट 2018

येवला - साधारणतः १९७८ चा विषय आहे..येवला मर्चंट बँकेच्या नूतन वास्तूच्या उद्घाटनाचे निमंत्रण देण्यासाठी तत्कालीन परराष्ट्रमंत्री. अटलजी वाजपेयीकडे येथील काही पदाधिकारी दिल्लीला गेले होते.. मात्र भरगच्च परदेश दौरे असल्याने अटलजींनी अडचण दाखवली. पण हेच शिष्टमंडळ जेव्हा संघाचे सरकार्यवाह स्व. भाऊराव देवरस यांच्याकडे गेले आणि हट्टाने आग्रह केला..त्यावर भाऊरावांनी तत्काळ अटलजींना दुरध्वनी करून सांगितले कि, "तु हर बार विदेशका सोच करेगा तो देशका कौन सोचेगा...अटल तुझे येवला जाना है और जानाही पडेगा..." आणि आपल्या गुरूचा आदेश प्रमाण मानून अटलजी येवल्याला आले..

येवला - साधारणतः १९७८ चा विषय आहे..येवला मर्चंट बँकेच्या नूतन वास्तूच्या उद्घाटनाचे निमंत्रण देण्यासाठी तत्कालीन परराष्ट्रमंत्री. अटलजी वाजपेयीकडे येथील काही पदाधिकारी दिल्लीला गेले होते.. मात्र भरगच्च परदेश दौरे असल्याने अटलजींनी अडचण दाखवली. पण हेच शिष्टमंडळ जेव्हा संघाचे सरकार्यवाह स्व. भाऊराव देवरस यांच्याकडे गेले आणि हट्टाने आग्रह केला..त्यावर भाऊरावांनी तत्काळ अटलजींना दुरध्वनी करून सांगितले कि, "तु हर बार विदेशका सोच करेगा तो देशका कौन सोचेगा...अटल तुझे येवला जाना है और जानाही पडेगा..." आणि आपल्या गुरूचा आदेश प्रमाण मानून अटलजी येवल्याला आले..

येथील भाजपाचे जेष्ठ नेते व मर्चंट बँकेचे संचालक धनंजय कुलकर्णी यांनी आज भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या निधनानंतर त्यांच्या येवल्याशी संबधित असलेल्या आठवणीना उजाळा दिला. जुन्या स्मृती आठवताना कुलकर्णी यांना गहिवरून आले. स्व. अटलजी सर्वप्रथम येथे ४ मे १९७० रोजी आले.त्यावेळी रात्री शहरातील शनिपटांगन येथे त्यांची सभा झाली.  त्यावेळी तत्कालीन जनसंघाचे शहराध्यक्ष अरुणशेठ गुजराथी यांनी पॅनासॉनिक कंपनीचा टेपरेकॉर्डर आणुन त्यांचे संपूर्ण भाषण रेकॉर्ड केले होते.जनसंघाचे तत्कालीन नेते. स्व.मदनलालजी हेडा यांच्याकडे ते मुक्कामी असतांना रात्रीच्या जेवनावेळी त्यांना वाढण्याचे भाग्य माझी आई उर्मिला कुलकर्णी यांना लाभल्याचे धनंजय कुलकर्णी सांगतात.

येथील जनसंघाचे दिवंगत नगराध्यक्ष कै.केशवरावजी पटेल यांचे आकस्मीक निधन झाले. त्यावेळी येवला मुक्कामी असतांना अटलजी हे पटेल परिवाराच्या सांत्वनासाठी पहाटे ५.३० वाजता त्यांच्या निवासस्थानी पायी चालत गेले. होते,यात त्यांची संवेदनशिलता व कार्यकर्त्यांच्या प्रती असलेली भावना खूप काही शिकवते.

त्यानंतर ५ मेला अटलजी यांची नाशिक येथे हायस्कुल ग्राऊंडवर जाहिर सभा होती.तत्पुर्वी नाशिकला आर.पी. विद्यालयात संघ शिक्षा वर्गात अटलजींचे बौद्धिक भाषण झाले. मी व माझा मित्र त्यावर्षी संघ शिक्षा वर्गाला गेलो होतो. सभा आटोपल्यावर आम्ही नाशिक जनसंघाचे अध्यक्ष कै.दादासाहेब वडनगरे यांच्या घरी जाऊन अटलजींना भेटण्याची इच्छा व्यक्त केली.त्यावेळी कै. दादांनी आमची अटलजींसोबत भेट घडवुन आणली.त्या भेटीने आम्ही भारवुन गेलो.त्यांची भेट व स्वाक्षरी आजही मनाला उभारी देते असे कुलकर्णी सांगतात.

यानंतर येवला मर्चन्टस् को-ऑप बँकेने उभारलेल्या स्वतच्या वास्तुच्या उद्घाटनासाठी तत्कालीन परराष्ट्रमंत्री मा.अटलजींच्या हस्तेच व्हावे असा आग्रह तत्कालीन चेअरमन कै. मदनलालजी हेडा व सर्व संचालकांचा होता. त्यासाठी डिसेंबर १९७८ मध्ये मदनलालजी हेडा, बँकेचे तत्कालीन संचालक कै.प्रभाकरदादा कासार, कै.श्रीधरभाऊ गायकवाड, कै.शरद पटणी, कै.भाऊलाल लोणारी, कै.जगन्नाथ सोनवणे यांचेसह मोतीकाका परदेशी, सुरेशभाई गुजराथी व मीही दिल्लीला गेलो होते. जालन्याचे माजी खासदार पुंडलीकराव दानवेना बरोबर घेऊन अटलजींना आमंत्रण दिले. परंतु परराष्ट्रमंत्री असल्याने व परदेश दौर्याचा भरगच्च कार्यक्रम असल्याने त्यांनी अत्यंत विनम्रपणे नकार दिला.मात्र उद्घाटन त्यांच्याच हस्ते व्हावे असा हट्ट व उत्कट इच्छा असल्याने आम्ही सर्वजण दिल्लीतील रा.स्व.संघाच्या कार्यालयात गेलो. सुदैवाने संघाचे सरकार्यवाह स्व. भाऊराव देवरस कार्यालयात होते. आम्ही त्यांची भेट घेऊन त्यांना आमचा मनोदय सांगितला. त्यावर अटलजींचे गुरु असलेल्या स्व.भाऊराव यांनी तात्काळ अटलजींना दुरध्वनी करून स्पष्ट आदेश दिला की, "तु हर बार विदेशका सोच करेगा तो देशका कौन सोचेगा...अटल तुझे येवला जाना है और जानाही पडेगा." आणि मग स्व. भाऊराव यांनी सांगीतल्या नुसार आम्ही पुन्हा अटलजींची घेतली तेव्हा ते सर्वांकडे हसत पाहत म्हणाले, "आप सभी तो मेरे गुरुके यहाँ जाकर आये हो। अब तो गुरुके आदेशका मुझे पालन करनाही होगा। अब आप निश्चिंहत हो कर जाओ मैने कार्यक्रम का निमंत्रण स्विकार लिया है.. त्यानुसार १९ मे १९७९ रोजी बँकेच्या नुतन वास्तुचे उद्घाटन अटलजींच्या हस्ते झाले.याचवेळी संघाचे द्वितीय सरसंघचालक जनसंघाचे माजी अध्यक्ष दिनदयाळजी उपाध्याय यांच्या छायाचित्राचे अनावरण नगरपालिका सभागृहात अटलजींच्या हस्ते करण्यात आले होते. त्यांच्या या दोन आठवणी अविस्मरणीय असल्याचे कुलकर्णी अभिमानाने सांगतात.

Web Title: atal, you have to came to yeola