"एटीएम' ठरले शोपीस; रांगांची लांबी वाढतेय

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 15 डिसेंबर 2016

जुने नाशिक - नोटाबंदीच्या निर्णयानंतर उद्‌भवलेली परिस्थिती आजही बॅंक व "एटीएम'बाहेर दिसून येत आहे. खात्यातील पैसे काढण्यासाठी नागरिकांच्या बॅंका व एटीएमबाहेरील रांगा वाढत चालल्या आहेत; परंतु नोटांच्या टंचाईमुळे एटीएममध्ये खडखडाट, तर बॅंकेतून ठरावीक रक्कम काढण्याचे रिझर्व्ह बॅंकेचे आदेश यामुळे त्यांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

नोटाबंदीच्या निर्णयानंतर देशातील जनतेवर मोठे आर्थिक संकट ओढावले आहे. दैनंदिन व्यवहार करणे अवघड झाले आहे. आज, उद्या परिस्थिती सुधारेल या आशेपोटी नागरिक आपले जीवन कसेबसे व्यतीत करत आहेत. प्रत्यक्षात त्यांना त्यासाठी किती संघर्ष करावा लागतोय, हे तेच समजू शकतात. स्वतःची व तीही किरकोळ रक्कम काढण्यासाठी नागजगकांना बॅंकेबाहेर तासन्‌तास रांगा लावून उभे राहावे लागत आहे.
बऱ्याच वेळा रांगेत उभे राहण्यावरूनही नागरिकांचे आपापसांत वाद होताना दिसत आहेत. आज दुपारच्या सुमारास द्वारका येथील बॅंक ऑफ महाराष्ट्रबाहेरही असेच चित्र बघावयास मिळाले. युवक, महिला व ज्येष्ठ सर्वच बॅंकेतून रक्कम काढण्यासाठी रांगेत उभे होते. तेवढ्यात एक व्यक्ती पुढे जाण्याचा प्रयत्न करत असताना महिलांनी त्यास रांगेत येण्यास सांगितले. त्यावरून त्या व्यक्तीत व रांगेत उभ्या असलेल्या महिलांमध्ये वाद झाला. बॅंकेच्या सुरक्षारक्षकांनी मात्र त्या वादाकडे दुर्लक्ष करत बॅंकेचे गेट बंद ठेवत नागरिकांना बाहेर उभे राहण्याचा सल्ला दिला. दुसरीकडे, बॅंकेतील गर्दीपासून वाचण्यासाठी काही नागरिकांनी एटीएमचा मार्ग अवलंबला खरा; परंतु नोटांअभावी शहरातील बरेच एटीएम बंद, तर काही उघडे होते. पण त्यांच्यात नोटांचा खडखडाट असल्याने "असून नसल्यासारखी' परिस्थिती शहरातील एटीएमबाबत दिसून येते. त्यामुळे बऱ्याच नागरिकांना आजही विविध समस्यांना सामोरे जावे लागत असल्याने त्यांच्याकडून केंद्र सरकारवर जोरदार टीका सुरू झाली आहे. पुरेशा प्रमाणात नवीन नोटा बॅंकांना उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.

Web Title: atm crowd