टोळक्‍याकडून एकावर प्राणघातक हल्ला

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 जानेवारी 2017

नाशिक - सुंदरनारायण मंदिर परिसरात शस्त्राचा धाक दाखवून दहशत पसरविणाऱ्या तिघांनी एकावर प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यामध्ये राजेंद्र काशीद (वय ४७, रा. सीतागुंफा रोड, पंचवटी) गंभीर जखमी झाले. या प्रकरणी एकास अटक करण्यात आली असून, दोघे फरारी आहेत. संशयितांमध्ये एक कथित पत्रकार असल्याची चर्चा आहे. 

शनिवारी (ता. १४) रात्री नऊच्या सुमारास राजेंद्र काशीद त्यांच्या मित्रांबरोबर सुंदरनारायण मंदिराजवळ चर्चा करीत होते. त्याचवेळी कथित पत्रकार संशयित नाना साळुंखे (रा. गंगावाडी), किरण रमेश कोकाटे (रा. फुलेनगर), गणेश दातीर हातामध्ये धारदार शस्त्र घेऊन परिसरामध्ये दहशत माजवित होते. संशयितांनी परिसरातील काही वाहनांचे नुकसानही केले. त्या वेळी काशीद यांनी संशयितांना जाब विचारला असता, नाना साळुंखे याने काशीद यांच्या डोक्‍यावर धारदार शस्त्राने वार केला. मात्र, वेळीच सावध झालेल्या काशीद यांनी हाताने तो वार अडविला. त्यामुळे त्यांच्या डाव्या हाताला गंभीर दुखापत झाली. या घटनेनंतर तिघाही संशयितांनी घटनास्थळावरून पळ काढला. त्या वेळी एक संशयित किरण कोकाटे पळताना पडला आणि त्याच्या डोक्‍याला दुखापत झाली. परिसरातील नागरिकांनी संशयित कोकाटे यास पकडून सरकारवाडा पोलिसांच्या ताब्यात दिले. तर साळुंखे, दातीर हे दोघे फरारी झाले. जखमी काशीद यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

Web Title: From the attack on a gang

टॅग्स