esakal | हळदीत नाचताना फक्त धक्का लागला..अन् थेट हल्लाच..थरार...
sakal

बोलून बातमी शोधा

haldi samarambh.jpg

ढिकलेनगरमध्ये सचिन निकम यांच्याकडे लग्न सोहळ्यानिमित्ताने सोमवारी (ता.16) रात्री हळदीचा कार्यक्रम होता. त्यावेळी ऋषिकेश व त्याचे मित्र संजय कुलथे, कौस्तुभ गोसावी, कुणाल यांच्यासह संशयित आणि काही नातलग मंडळी नाचत होते. त्यावेळी संशयित विशाल दुसाने याचा धक्का ऋषिकेश यास लागला. त्यामुळे त्याने संशयिताला व्यवस्थित नाचण्यास सांगितले. परंतु, संशयित विशाल यास त्याचा राग आला

हळदीत नाचताना फक्त धक्का लागला..अन् थेट हल्लाच..थरार...

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नाशिक : दोन दिवसांपूर्वीच नाशिकरोड परिसरात दोघांवर टोळक्‍याने चॉपर-कोयत्याने वार करीत त्यांना जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडलेली असतानाच, जेलरोडच्या ढिकलेनगरमध्ये लग्नाच्या हळदीच्या कार्यक्रमात नाचताना धक्का लागला. या क्षुल्लक कारणावरून संशयिताने एकावर कोयत्याने वार करीत जखमी केल्याची घटना घडली आहे. जखमीवर कोयत्याने वार केलेला असताना, नाशिकरोड पोलिसात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

हळदीच्या कार्यक्रमातील असा घडला प्रकार.. 
या घटनेमध्ये ऋषिकेश रवींद्र चौधरी (21, रा. पूर्वांचल कॉलनी, ढिकलेनगर, जेलरोड) असे जखमी युवकाचे नाव असून विशाल सागर दुसाने (रा. साईनगर, जेलरोड), रवी लिपणे असे दोघा संशयितांची नावे आहेत. ऋषिकेश चौधरी याच्या फिर्यादीनुसार, ढिकलेनगरमध्ये सचिन निकम यांच्याकडे लग्न सोहळ्यानिमित्ताने सोमवारी (ता.16) रात्री हळदीचा कार्यक्रम होता. त्यावेळी ऋषिकेश व त्याचे मित्र संजय कुलथे, कौस्तुभ गोसावी, कुणाल यांच्यासह संशयित आणि काही नातलग मंडळी नाचत होते. त्यावेळी संशयित विशाल दुसाने याचा धक्का ऋषिकेश यास लागला. त्यामुळे त्याने संशयिताला व्यवस्थित नाचण्यास सांगितले. परंतु, संशयित विशाल यास त्याचा राग आला आणि त्याने त्याच्याकडील कोयत्यासारखे हत्यार काढून ऋषिकेशच्या डोक्‍यावर वार करून जखमी केले.

मैत्रीत दगा...मित्राचाच मृतदेह टाकला शौचालयाच्या टाकीत...पण का?

तसेच, संशयित रवी लीपणे याने लाकडी दांडक्‍याने मारहाण केली. त्यामुळे हळदीच्या कार्यक्रमात एकच गोंधळाची स्थिती निर्माण झाली. याप्रकरणी नाशिकरोड पोलिसात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रत्यक्षा संशयिताने पोलीस आयुक्तांच्या शस्त्रबंदीच्या आदेशाचेही उल्लंघन करताना, कोयत्यासारखे हत्यार वापरल्यामुळे गंभीर स्वरुपाचा गुन्हा दाखल होणे अपेक्षित असताना, केवळ मारहाणीचा गुन्हा दाखल केल्याने पोलिसांच्या भूमिकेविषयीची शंका घेतली जाऊ लागली आहे. 

PHOTOS : माणुसकी निभावून दाखवूयाच!..'या' तरुणांचं ठरलं तर...