अपघातातील मृत प्रवाशाच्या पत्नीस रक्कम देण्यास टाळाटाळ...भरपाईसाठी महामंडळाची एसटी बसच जप्त 

सकाळ वृतसेवा 
Wednesday, 11 December 2019

निफाड तालुक्‍यातील कोकणगाव फाटा येथे 27 सप्टेंबर 2015 ला नंदुरबार आगाराच्या बसने पिक-अपला धडक दिल्याने झालेल्या अपघातात तीन जण ठार, तर दोन जखमी झाले होते. अपघातात नरेंद्र धनवटे (रा. दात्याणे, ता. निफाड) मृत्युमुखी झाले होते. त्यांच्या पत्नी सुनीता यांनी निफाड येथील जिल्हा व सत्र न्यायालयात मोटार अपघात नुकसानभरपाई अर्ज दाखल केला होता.

नाशिक : मोटार अपघात नुकसानभरपाईची तब्बल 23 लाखांची रक्कम देण्याचे आदेश निफाड येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. टी. ढोके यांच्या न्यायालयाने 2018 मध्ये दिल्यानंतरही एस.टी. महामंडळाने थकीत ठेवल्याने लासलगाव बस आगाराची कसारा-लासलगाव बस मंगळवारी (ता. 10) निफाड बसस्थानकावर सायंकाळी सव्वापाचला निफाड न्यायालयाच्या बेलिफांनी प्रवासी तसेच चालक व वाहकास खाली उतरवून बस जप्त केली आणि निफाड न्यायालयाच्या आवारात जमा केली. 

कसारा-लासलगाव बस जप्त...न्यायालयाची कारवाई 
निफाड तालुक्‍यातील कोकणगाव फाटा येथे 27 सप्टेंबर 2015 ला नंदुरबार आगाराच्या बसने पिक-अपला धडक दिल्याने झालेल्या अपघातात तीन जण ठार, तर दोन जखमी झाले होते. अपघातात नरेंद्र धनवटे (रा. दात्याणे, ता. निफाड) मृत्युमुखी झाले होते. त्यांच्या पत्नी सुनीता यांनी निफाड येथील जिल्हा व सत्र न्यायालयात मोटार अपघात नुकसानभरपाई अर्ज दाखल केला होता. त्याची सुनावणी होऊन पतीच्या मृत्यूबद्दल 23 लाख 37 हजार रुपयांची नुकसानभरपाई देण्याचा आदेश दिला होता; परंतु एस.टी. महामंडळाने नुकसानभरपाई रक्कम देण्यास टाळाटाळ चालविली होती. सुनीता धनवटे यांनी भरपाई मिळण्याकरिता निफाड येथील जिल्हा व सत्र न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यातही सुनावणीवेळी रक्कम न भरल्याने ऍड. उत्तम कदम व ऍड. संदीप पवार यांनी रक्कम वसुलीकरिता न्यायालयात बस जप्त करून रक्कम वसुली करण्याचा विनंती अर्ज केला होता. त्यानुसार न्यायाधीश एस. टी. ढोके यांनी 7 डिसेंबरला रक्कम वसुलीसाठी बस जप्त करण्याची कारवाई करावी, असे आदेश दिले होते.

हेही वाचा > पुन्हा सैराटचा थरार...बहिणीचे प्रेमसंबंध समजताच भावाने..

ही कारवाई करण्याकरिता निफाड न्यायालयाचे बेलिफ मंगळवारी सायंकाळी सव्वापाचला निफाड बसस्थानकावर पोचले. लासलगाव बस आगाराची कसारा-लासलगाव बस स्थानकावर आली असता सुनीता धनवटे यांच्या 23 लाख 37 हजार रुपयांची नुकसानभरपाई आणि वसुलीकरिता जप्त केली. बेलिफांनी प्रवासी तसेच चालक व वाहकास खाली उतरवून ही बस जप्त करत निफाड न्यायालयाच्या आवारात आणली.  

हेही वाचा > मोबाईलवर कार्टून दाखविण्याचे सांगत सात वर्षाच्या चिमुकलीला नेले वरच्या खोलीत..अन्.. 

हेही वाचा > महिलेचा आरडाओरड ऐकू आल्याने 'त्यांनी' तिथे जाऊन पाहिले...बघताच...

बघा > PHOTO : उपाशीपोटी वयात असलेली 'ती' परप्रांतीय तरुणी...भेदरलेल्या अवस्थेत टोल नाक्यावर उभी होती...त्यातच.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Avoid compensation money to wife of a dead passenger court seized ST bus

टॉपिकस