म्हसाई माता महिला पतसंस्थेला जिल्हास्तरीय, तालुकास्तरीय दुहेरी प्रथम पुरस्कार

भगवान जगदाळे
गुरुवार, 12 जुलै 2018

निजामपूर-जैताणे (धुळे) : येथील म्हसाई माता महिला पतसंस्थेला धुळे जिल्हा पतसंस्था फेडरेशनतर्फे नुकतेच आदर्श पतसंस्थेचा जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय दुहेरी प्रथम पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. पतसंस्थेचे संस्थापक लक्ष्मीकांत शाह, उपाध्यक्षा शैलजा सोंजे, संचालिका योगिता शाह, संगीता जयस्वाल, स्नेहल राणे, आशाबाई सूर्यवंशी, वर्षा जाधव, व्यवस्थापक निलेश जयस्वाल यांनी हा पुरस्कार स्वीकारला. पतसंस्था फेडरेशनच्या वार्षिक सभेत देवपूर, धुळे येथील महाराणा प्रताप विद्यालयात पुरस्कार प्रदान झाला.

शिरपूरचे तालुका उपनिबंधक मनोज चौधरी, चार्टर्ड अकौंटंट राजाराम कुलकर्णी, ग.स. बँकेचे माजी चेअरमन रवींद्र खैरनार, फेडरेशनचे धुळे जिल्हाध्यक्ष अरुण महाले आदींसह संचालक मंडळाच्या हस्ते स्मृतिचिन्हे देऊन सन्मानपूर्वक हा प्रथम पुरस्कार वितरित करण्यात आला. यापूर्वीही म्हसाई माता पतसंस्थेला जिल्हास्तरीय, विभागस्तरीय व राज्यस्तरीय असे विविध सात मानाचे प्रथम पुरस्कार मिळाले आहेत. पतसंस्था फेडरेशनच्या मूल्यांकन निकषानुसार व प्रश्नावलीनुसार महिला पतसंस्थेच्या गटातून ही यशस्वी निवड झाली.

"आमच्या पतसंस्थेच्या निर्णय प्रक्रियेत महिला संचालिका मंडळाचा प्रत्यक्ष सहभाग असतो. पुरस्कारसुद्धा प्रत्यक्ष संचालिका स्वीकारतात. आमची पतसंस्था ही स्त्रीप्रधान परंतु लोकशाही मार्गाने चालणारी परिसरातील आदर्श पतसंस्था आहे. याचे सर्व श्रेय सभासद, ठेवीदार, नियमित कर्जदार, हितचिंतक, संचालक मंडळ व कर्मचाऱ्यांना जाते."
-उर्मिलाबेन विरेंद्रलाल शाह,
अध्यक्षा, म्हसाई माता महिला पतसंस्था, निजामपूर-जैताणे ता.साक्री...

Web Title: award to mhasai mata mahila patasanstha