आयुर्वेद, युनानीसाठी प्रवेश परीक्षा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 21 मे 2019

परीक्षेचे स्वरूप
सीबीटी अर्थात ‘कॅम्प्युटर बेस्ड टेस्ट’चा कालावधी दीड तासाचा असेल. ४०० गुणांच्या या परीक्षेत बहुपर्यायी स्वरूपाचे प्रश्‍न विचारले जातील. प्रत्येक अचूक उत्तरासाठी विद्यार्थ्याला चार गुण मिळतील. चुकीच्या उत्तरासाठी एक गुणाची कपात होईल. आयुर्वेदासाठी इंग्रजी व हिंदी, युनानीकरिता इंग्रजी व ऊर्दू, सिद्धाकरिता इंग्रजी व तमीळ, तर होमिओपॅथीसाठी इंग्रजी माध्यमात परीक्षा देण्याचा पर्याय उपलब्ध असेल.

नाशिक - आयुर्वेद, युनानी, सिद्धा आणि होमिओपॅथी शाखांतील एमडी, एमएस, पीजी डिप्लोमा आदी शिक्षणक्रमांत शैक्षणिक वर्ष २०१९-२० मध्ये प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा द्यावी लागणार आहे. ‘ऑल इंडिया आयुष पोस्ट ग्रॅज्युएट एंट्रन्स टेस्ट’साठी (एआयएपीजीईटी) नावनोंदणीला सुरवात झाली आहे. इच्छुकांना १५ जूनपर्यंत ऑनलाइन अर्ज करता येतील.

‘नॅशनल टेस्टिंग एजन्सी’तर्फे (एनटीए) ही परीक्षा होत आहे. प्रवेशाचे वेळापत्रक व शिक्षणक्रमाचे माहितीपत्रक संकेतस्थळावर आहे. परीक्षा १४ जुलैला घेतली जाणार आहे. ही परीक्षा संगणकावर आधारित अर्थात ऑनलाइन असणार आहे. अन्य कुठल्याही महाविद्यालय, संस्था, विद्यापीठांना प्रवेश परीक्षा घेण्याची परवानगी नसल्याने या परीक्षेला महत्त्व प्राप्त झाले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ayurved Unani Entrance Online Exam