युवकाची बिबट्याशी झुंज; मोराडे इस्टेट येथील घटना

Leopard latest marathi news
Leopard latest marathi newsesakal

पंचवटी (जि. नाशिक) : पस्तीस वर्षीय युवकाने आलेल्या काळावर मात करीत अक्षरक्ष बिबट्याशी झुंज दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सदर घटना रविवारी (ता. ७) रात्री बारा ते साडेबाराच्या दरम्यान मोराडे इस्टेट येथे घडली. यात युवकाच्या डाव्या हाताला बिबट्याचे दात लागले असून बराच रक्तस्राव झाला आहे. त्याच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे. (youth fight with leopard Incident at Morande Estate nashik Latest Marathi News)

मोराडे इस्टेट भागात शेतकऱ्याच्या बऱ्याच वस्त्या आहेत. या ठिकाणी मोरे कुटुंबीयांची यांची शेती आहे आहे. ही शेती बंडूनाना थाळकर कुटुंब सांभाळतात. त्याच जवळपास वीस ते बावीस जणांचे कुटुंब वास्तव्य करते.

त्यांच्या कुटुंबातील जवळपास दहा ते बारा सदस्य अंगणात झोपलेले होते. रात्री बारा ते साडेबाराच्या सुमारास दबा धरून बसलेल्या बिबट्याने भारत बंडू थाळकर यांच्यावर हल्ला चढविला. त्यांच्या डाव्या हाताला धरून ओढत घेऊन चालला होता. ओढत नेत असताना भारतने बाहेर असलेल्या चुली जवळील लोखंडी फुकणी उजव्या हातात घेऊन बिबट्यास मारले अन् बिबट्याने धूम ठोकली.

या हल्ल्यात भारत यांच्या डाव्या हाताला बिबट्याचे तीन ते चार दात चांगलेच लागले, असून रक्तस्राव झाला आहे. घटनेची माहिती मिळताच वनविभाग वनपरिक्षेत्र अधिकारी भदाणे, उपवनरक्षक अधिकारी पंकज गर्ग यांच्या आदेशान्वये वनपाल अनिल अहिरराव, वनरक्षक उत्तम पाटील, वाहनचालक अशोक खांजोळे यांनी परिसराची पाहणी केली. तसेच वनपाल उत्तम पाटील आणि जखमी भारत यास शासकीय रुग्णालयात उपचारार्थ घेऊन गेले. भारत थाळकर याचे प्रकृती स्थिर आहे. घटनास्थळापासून काही अंतरावर असलेल्या नाल्यालगत पिंजरा लावण्यात आला आहे.

Leopard latest marathi news
Nashik : आगीत विवाहाची शिदोरीची राख

आमदारांनी दिली घटनास्थळी भेट

मोराडे इस्टेट येथे बिबट्याने हल्ला केल्याची माहिती आमदार राहुल ढिकले यांना मिळाली. त्यांनी लागलीच घटनास्थळी धाव घेतली. हल्ल्यात जखमी झालेला भारत थाळकर याची विचारपूस केली. तसेच वनविभागाच्या अधिकारी यांना विचारणा करीत सूचना केल्या. या वेळी रंगनाथ मोरे, रुंजा मोराडे, शिवाजी मोराडे, अजय मोराडे, सुनील मोराडे, टिंकू मोराडे , महेंद्र मोराडे, अनिल मोराडे, शुभम मोराडे आदी शेतकरी उपस्थित होते.

Leopard latest marathi news
कानबाई चालनी गंगेवरी, साखर पेरत चालनी माय

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com