Dhule News : दहशतवाद्यांच्या तावडीतील दोघांची सुटका..!

दहशतवादी हल्ल्यास तोंड देण्यासाठी पोलिस यंत्रणा सज्ज असल्याची चाचपणी करण्यासाठी पोलिसांनी बुधवारी (ता. २४) धुळे महापालिकेच्या बाभळे जलशुद्धीकरण केंद्रात ‘मॉकड्रिल’ घेतले.
A moment of the encounter between the terrorists and the police during the mock drill at the water treatment plant of the Dhule Municipal Corporation.
A moment of the encounter between the terrorists and the police during the mock drill at the water treatment plant of the Dhule Municipal Corporation.esakal

Dhule News : महापालिकेच्या बाभळे (ता. शिंदखेडा) जलशुद्धीकरण केंद्रातील दोन कर्मचाऱ्यांना दहशतवाद्यांनी ओलीस ठेवल्याची माहिती मिळताच पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल होतो अन् त्या कर्मचाऱ्यांची सुखरूप सुटका करण्याचा थरार सुरू होतो. यामुळे मात्र मुंबई-आग्रा महामार्गावर वाहनधारकांची गर्दी जमते, भीतीचे वातावरण निर्माण होते.

नंतर मात्र, हा थरार खराखुरा नव्हे तर पोलिसांची ती रंगीत तालीम (मॉकड्रिल) असल्याचे सत्य समोर येते अन् घाबरलेले नागरिक सुटकेचा निःश्वास सोडतात. (background of Republic Day police took mock drill at Water Purification Center of Dhule Municipal Corporation to face any terrorist attack news)

प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर कुठल्याही दहशतवादी हल्ल्यास तोंड देण्यासाठी पोलिस यंत्रणा सज्ज असल्याची चाचपणी करण्यासाठी पोलिसांनी बुधवारी (ता. २४) धुळे महापालिकेच्या बाभळे जलशुद्धीकरण केंद्रात ‘मॉकड्रिल’ घेतले.

जलशुद्धीकरण केंद्राच्या आवारातील फिल्टर प्लांटजवळ दोन अतिरेकी शस्त्रांसह आले आणि त्यांनी दोन कर्मचाऱ्यांना ओलीस ठेवल्याची माहिती कर्मचाऱ्यांनी पोलिस नियंत्रण कक्षात दिली. पोलिस येईपर्यंत परिसरात लोकांची मोठी गर्दी जमली.

अतिरेक्यांनी दोन कर्मचाऱ्यांना ओलीस ठेवून दशहत निर्माण केली. त्यामुळे काही काळ तेथे भीतीचे वातावरण निर्माण झाले.

काही वेळाने अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे यांच्यासह दहशतवादी हल्लाविरोधी शाखा, जलद प्रतिसाद पथक, दंगलविरोधी पथक, बॉम्बशोधक पथक, श्वानपथक, अंगुली मुद्रा व तपासणी पथक, स्थानिक पोलिस ठाणे, जिल्हा रुग्णालय, धुळे फायर ब्रिगेड व्हॅनसह अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी पोचले.

A moment of the encounter between the terrorists and the police during the mock drill at the water treatment plant of the Dhule Municipal Corporation.
Dhule Municipality News : नगरोत्थान, दलित वस्ती, दलितेतर वस्तीची कामे; कचऱ्यावर प्रक्रियेसाठी 4 कोटी मंजूर

या पथकांनी विविध मार्गाने जलशुद्धीकरण केंद्रात प्रवेश केला व परिसराला घेराव घालून संशयित दहशतवाद्यांना पकडले. त्यांच्याकडील शस्त्र, साहित्य व विषारी पावडर जप्त केली. ओलीस ठेवलेल्या दोन्ही कर्मचाऱ्यांची सुखरूप सुटका केली.

मॉकड्रिल यशस्वी झाल्यानंतर पोलिसांनी लाउडस्पीकरवरून सर्व परिस्थिती नियंत्रणात असल्याचे व पोलिसांची रंगीत तालीम असल्याचे सांगत नागरिकांनी घाबरू नये, असे आवाहन केले. पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलिस अधीक्षक काळे, पोलिस उपअधीक्षक सचिन हिरे, पोलिस निरीक्षक धनंजय पाटील.

गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्यासह दहशतवादविरोधी शाखेचे पंडित सोनवणे, धुळे व नाशिक युनिट, जलद प्रतिसाद पथक, दंगलविरोधी पथक, बॉम्बशोधक पथक, श्वानपथक, अंगुली मुद्रा व तपासणी पथक, जिल्हा रुग्णालय, धुळे फायर ब्रिगेड व्हॅनसह अधिकारी व कर्मचारी मॉकड्रिलमध्ये सहभागी झाले.

A moment of the encounter between the terrorists and the police during the mock drill at the water treatment plant of the Dhule Municipal Corporation.
Dhule News : मयुरा पारख यांनी साकारले चॉकलेटचे श्रीराम मंदिर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com