बागलाण तालुक्यात बेमोसमी पावसामुळे उन्हाळी कांद्याचे नुकसान

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 एप्रिल 2018

सटाणा : बागलाण तालुक्यात आज (ता.१२) दुपारनंतर बेमोसमी पावसाने थैमान घातले. काढणीनंतर शेतातील उन्हाळी कांदा उघड्यावर सापडल्याने कांदा उत्पादकांचे करोडो रुपयांचे नुकसान झाले आहे. तर गहू, हरभरा, हिरवी मिरची, टोमेटो आदी पिके बेमोसमी पावसाने बाधित झाल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. 

गेल्या चार दिवसांपासून तालुक्यात सर्वत्र प्रचंड उष्मा जाणवत होता. अवकाळी पावसाच्या भीतीने शेतकऱ्यांची लगबग सुरु होती. दिवसभर ढगाळ हवामान काही ठिकाणी ऊन तर काही ठिकाणी सावली यामुळे अवकाळीची शक्यता वर्तविली जात होती. आज झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांपुढे तयार झालेला उन्हाळी कांदा वाचविण्याचा खरा प्रश्न होता. आज बऱ्याच शेतकऱ्यांचा कांदा काढून चाळीत साठवण्यापूर्वी शेतातच ढीग मारून ठेवला होता. मात्र दुपारनंतर आलेल्या अवकाळी पावसात हा कांदा भिजला. पावसाने ओला झालेला कांदा आता विक्री व साठवण्या योग्य योग्य राहिलेला नाही. भाजीपाला पिके, टरबूज, खरबूज, काकडी या पिकांवरही आजच्या अवकाळी पावसाचा विपरीत परिणाम होणार आहे. 

दुपारनंतर आदिवासी पश्चिम पट्ट्यातील नांदीन, दरेगाव, कंधाणे, विंचुरे, वटार, जायखेडा, ब्राह्मणपाडे, निरपूर, नवेगाव, तिळवण, सोमपूर, खमताणे, औंदाणे, तरसाळी, वनोली, वीरगाव, कपालेश्वर, जोरण, किकवारी, केरसाणे, दसाणे, पिंगळवाडे, मुंगसे, करंजाड आदी परिसरात वादळी वारे व विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस झाला. जायखेडा परिसरात सोसाट्याच्या वाऱ्यामुळे मुख्य रस्त्यावर वृक्ष उन्मळून पडल्याने जायखेडा - सोमपूर - ताहराबाद या राज्यमार्गावरील वाहतूक काहीकाळ ठप्प झाली होती. 

Web Title: baglan taluka lost oniom crop due to rain