बागलाण तालुका शिवसेनेतर्फे भाजप सरकारविरोधात मोर्चा

बागलाण तालुका शिवसेनेतर्फे भाजप सरकारविरोधात मोर्चा

सटाणा : बागलाण तालुका दुष्काळ जाहीर करावा, पेट्रोल, डिझेल व घरगुती गॅसचे दर नियंत्रणात आणावे, शेतीपंपाचे वीजबिल कमी करावे, सटाणा शहराचा वळण रस्त्याचा प्रश्न मार्गी लावावा, गटविकास अधिकारी व इतर शासकीय अधिकाऱ्यांच्या रिक्त पदांवर तात्काळ नियुक्त्या कराव्या यांसह विविध मागण्यांसाठी बागलाण तालुका शिवसेनेतर्फे आज शुक्रवार (ता.५) रोजी बागलाण तहसील कार्यालयावर कार्यलयावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाद्वारे केंद्र व राज्यात सत्तेमध्ये सहभागी असलेल्या शिवसेनेने भाजपला 'घरचा आहेर' दिला आहे.

आज सकाळी ११ वाजता येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख लालचंद सोनवणे, तालुकाप्रमुख डॉ.प्रशांत सोनवणे, शहरप्रमुख जयप्रकाश सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चास सुरवात झाली. मोर्चात संतप्त शिवसैनिकांनी महागाईस जबाबदार असलेल्या केंद्र व राज्यातील भाजपा शासनाच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी केल्याने परिसर दणाणून गेला होता. तहसील आवारात मोर्चा येताच सभेत रुपांतर झाले. यावेळी बोलताना उपजिल्हाप्रमुख  सोनवणे म्हणाले, शासनाने वाढलेले इंधनाचे दर कमी करून सर्वसामान्य जनतेला दिलाला द्यावा, बागलाण तालुक्यात यंदा पावसाने पाठ फिरविली असल्याने विहिरींच्या पाण्याची पातळी खालाविली अआहे. कमी पर्जन्यमान असलेल्या गावांतील आणेवारी ५० पैश्यांपेक्षा कमी करून तालुका दुष्काळ जाहीर करावा, शेतीपंपावरील बिलात सवलत देऊन वीजबिल त्वरित कमी करावे व शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, सटाणा शहरातील प्रलंबित वळण रस्त्याचा प्रश्न मार्गी लावून वाहतुकीची कोंडी कमी करावी.

गटविकास अधिकारी व इतर रिक्त पदांवर तात्काळ नियुक्त्या कराव्यात. या मागण्यांची दखल न घेतल्यास रस्त्यावर उतरून शिवसेना स्टाईलने जनआंदोलन छेडण्यात येईल. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्यास सर्वस्वी शासनच जबाबदार राहील, असा इशाराही सोनवणे यांनी दिला.

यावेळी नायब तहसीलदार विनोदकुमार चव्हाण यांना निवेदन देण्यात आले. मोर्चात संपर्कप्रमुख प्रशांत सातपुते, महिला संघटक मंगला भास्कर, माजी तालुकाप्रमुख अरविंद सोनवणे, माजी शहरप्रमुख शरद शेवाळे, अनिल सोनवणे, मुन्ना सोनवणे, राजनसिंग चौधरी, बापू कर्डीवाल, सचिन सोनवणे, निरंजन बोरसे, भाऊसाहेब नांद्रे, आनंदा लाडे, मंगलसिंग जोहरी, अमोल पगार, दगा खैरनार, विक्रांत सोनवणे, सागर पगार, राजू जगताप, रोशन बिरारी, कविता अहिरे, जया पाटील, अश्विनी बागुल, लता शिरसाठ, प्रमोद भामरे, रत्ना पवार, सुमन पवार, दुर्गाबाई निकम, साखरचंद बच्छाव, संदीप वाघ आदींसह कार्यकर्ते सहभागी होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com