esakal | VIDEO : कॉंग्रेस सोडून गेलेल्यांना परतीची दारे बंद - बाळासाहेब थोरात 
sakal

बोलून बातमी शोधा

balasaheb-thorat.jpg

विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर बदललेल्या सत्ता कारणात राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्याने अनेकांना आता पक्षात परतीचे वेध लागले आहेत. परंतू ज्यांनी पक्ष सोडला व आता अस्वस्थ झाले असून पुन्हा पक्षात येण्यासाठी प्रयत्न करत आहेत. परंतू पक्ष सोडलेल्यांची ज्यांना जागा देण्यात आली त्यांना विचारल्या शिवाय कॉंग्रेस मध्ये प्रवेश दिला जाणार नाही. असे थोरातांनी स्पष्ट केले.

VIDEO : कॉंग्रेस सोडून गेलेल्यांना परतीची दारे बंद - बाळासाहेब थोरात 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नाशिक : लोकसभा व विधानसभा निवडणुकी दरम्यान अनेकांनी कॉंग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी दिली परंतू विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर बदललेल्या सत्ता कारणात राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्याने अनेकांना आता पक्षात परतीचे वेध लागले आहेत. परंतू ज्यांनी पक्ष सोडला व आता अस्वस्थ झाले असून पुन्हा पक्षात येण्यासाठी प्रयत्न करतं आहेत परंतू पक्ष सोडलेल्यांची ज्यांना जागा देण्यात आली त्यांना विचारल्या शिवाय कॉंग्रेस मध्ये प्रवेश दिला जाणार नसल्याचे स्पष्टीकरण राज्याचे मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आज नाशिक भेटी दरम्यान दिले. 

नवीन कार्यकर्त्यांना विचारल्या शिवाय निर्णय घेतला जाणार नाही...
माजी मंत्री कै. तुकाराम दिघोळे यांच्या निवासस्थानी श्री. थोरात यांनी भेट देत कुटूंबियांचे सांत्वन केले. त्यानंतर धुळे येथे कार्यक्रमा निमित्त जाण्यासाठी हेलिपॅडवर आल्यानंतर माध्यम प्रतिनिधींशी त्यांनी संवाद साधला. पक्ष सोडून गेलेल्यांना पुन्हा पक्षात प्रवेश देताना नवीन कार्यकर्त्यांना विचारल्या शिवाय निर्णय घेतला जाणार नसल्याचे त्यांनी सांगताना नगर जिल्ह्यातील राजकारणाला हात घातला. माजी मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यावर त्यांनी अप्रत्यक्ष निशाणा साधला. महाविकास आघाडी सरकारमध्ये शपथ घेतलेल्या मंत्र्यांना खाते वाटप व मंत्रीमंडळाच्या विस्तारात वादाचा अडसर असल्याच्या प्रश्‍नावर त्यांनी आमच्यात कुठलाचं वाद नसल्याचे सांगताना उलट खेळी-मेळीने आम्ही प्रश्‍न सोडवतं असल्याचे सांगितले. मंत्रिमंडळाचे खातेवाटप दोन दिवसात होणार असल्याचा दावा त्यांनी केला.

हैद्राबाद बलात्कार प्रकरणातील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे, हे सर्वांना वाटत असले तरी एन्काऊंटर कोणत्या परिस्थितीत झाला याबद्दल त्यांनी बोलणे टाळले. 

 
कांद्यासाठी नवे धोरण 
महाविकास आघाडीने शेतकयांचे कर्ज माफ करण्याचा शब्द दिला आहे. सरकार आत्ताचं स्थापन झाले असून त्यांना आर्थिक मदत व कर्जमाफी संदर्भात लवकरचं निर्णय घेणार आहे. कांदा प्रश्‍नावर बोलताना श्री. थोरात यांनी शेतकऱ्याला चार पैसे मिळावे व ग्राहकालाही स्वस्तात कांदा उपलब्ध व्हावा, अशी यंत्रणा लवकरच अमलात आणण्याचे आश्‍वासन दिले.