Vidhan Sabha 2019 : तिकीट द्या,नाहीतर राजीनामा घ्या..

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 2 ऑक्टोबर 2019

पुर्व विधानसभा मतदारसंघातील इच्छुकांना वेटींग वर ठेवण्यात आल्याने आमदार बाळासाहेब सानप समर्थकांची घालमेल वाढली. यानंतर आज (ता.२) सानप यांच्या निवासस्थानी बैठक पार पडली. यावेळी संतप्त कार्यकर्ते व समर्थकांनी घोषणा बाजी करत ,तिकीट द्या नाहीतर राजीनामा घ्या अशी भूमिका घेत नगरसेवकांचे राजीनामा सत्र सुरु झाले.

नाशिक : गेल्या अनेक दिवसांपासून शहरातील विद्यमान आमदारांना उमेदवारी मिळेल कि नाही याबाबत असलेली उत्सुकता भाजपच्या पहिल्या यादीतून संपुष्टात आली. मध्य विधानसभा मतदारसंघातून देवयानी फरांदे तर पश्‍चिम विधानसभा मतदारसंघातून सिमा हिरे यांना पुनश्‍च उमेदवारी देण्यात आली. परंतू तीन दिवसांपुर्वी शक्तीप्रदर्शन झालेल्या पुर्व विधानसभा मतदारसंघातील इच्छुकांना वेटींग वर ठेवण्यात आल्याने आमदार बाळासाहेब सानप समर्थकांची घालमेल वाढली. यानंतर आज (ता.२) सानप यांच्या निवासस्थानी बैठक पार पडली. यावेळी संतप्त कार्यकर्ते व समर्थकांनी घोषणा बाजी करत ,तिकीट द्या नाहीतर राजीनामा घ्या अशी भूमिका घेत नगरसेवकांचे राजीनामा सत्र सुरु झाले. यावेळी पूनम धनगर, पूनम सोनवणे, सुमन सातभाई, प्रियांका माने, सुनीता पिंगळे यांनी बाळासाहेब सानप यांच्याकडे राजीनामे दिले. यावेळी सुधाकर बडगुजर, विलास शिंदे, डी जी सुर्यवंशी, सुदाम ढेमसे,चंद्रकांत खाडे, भागवत आरोटे, प्रवीण तिदमे, दीपक दातीर, सुवर्णा मटाले, किरण गामाणे, रत्नमाला राणे, हर्षा गायकर, संगीता जाधव, हर्षा बडगुजर, सत्यभामा गाडेकर, भूषण राणे, मामा ठाकरे, बाळा दराडे, पवन मटाले,अमोल जाधव,  संदीप गायकर, आदी मोठ्या संख्येने समर्थक उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: balasaheb sanap supporters gives resignation