बऱ्हाणपुरी मुजरा प्रकरणात पोलिसांच्या भूमिकेवर संशय

Mujara-Party
Mujara-Party

जळगाव - शहरासह जिल्ह्यातील कायदा व सुव्यस्थेचा प्रश्‍न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. अवैध धंद्यांवर कारवाई करणाऱ्या कणखर पोलिस अधिकाऱ्यांवर राजकीय दडपणातून गुन्हेगारांना संरक्षण मिळत असल्याप्रकरणी जिल्हा महिला असोसिएशनने थेट मुख्यमंत्र्यांना निवेदन देत निषेध नोंदविला आहे. 

महिला असोसिएशन ने मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, शहरात अनेक वर्षानंतर अवैधधंदे, जुगारअड्डे यांच्यासह बेकायदेशीर उद्योगांवर पोलिस दलाने कारवाई सुरू केली आहे. मात्र, ३१ डिसेंबर ‘थर्टी फर्स्ट’च्या रात्री शहराजवळील फार्म हाऊसवर घडला प्रकार निंदनीय असून पोलिसांनी फार्म हाऊसवर छापा टाकून ६ तरुणींसह २४ संशयितांना अटक केली होती. अटकेनंतर केवळ राजकीय दबावापोटी गुन्ह्यातील कलमे बदलून सौम्य करणे, गुन्हेगारांची नावे बदलणे, फार्म हाऊसच्या मालकासह जागा बदलणे आदी प्रकार केल्याचे सर्वश्रृत आहे.

हा सर्व प्रकार राजकीय नेत्यांच्या दडपणामुळे केल्याची जळगावकरांची खात्री झाली आहे. स्त्रीकडे भोगवादीदृष्टीने पाहणाऱ्या समाजविघातक आरोपींना राजकीय दबावामुळे संरक्षण मिळत असून, असे झाल्यास अय्याश धनदांडग्यांना कायद्याचा धाक उरणार नाही. शहराने वीस वर्षांपूर्वी ‘सेक्‍स स्कॅंडल’सारखा गंभीर गुन्हा घडला असून, अशा प्रवृत्तींना वेळीच ठेचणे आवश्‍यक आहे. यासाठी पोलिसांना आपल्याकडून नैतिक पाठबळ मिळावे, अशी अपेक्षा महिला संघटनांतर्फे व्यक्त करण्यात आली असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावे असलेले निवेदन जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांना देण्यात आले आहे. यावेळी महिला असोसिएशनच्या राजकुमारी बाल्दी, मंगला नगरकर, भारती पाथरकर, ज्योत्स्ना बऱ्हाटे, वासंती दिघे आदी महिला पदाधिकारी, कार्यकर्त्या उपस्थित होत्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com