पुण्याच्या बॅटरी चोरट्यास अटक

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 मे 2018

जुने नाशिक - बॅटरीचोर सिकंदर ऊर्फ आशू शेख (वय 19, रा. घोडेगाव, पुणे) यास भद्रकाली पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून चोरीची बॅटरी आणि दुचाकी जप्त केली आहे.

जुने नाशिक - बॅटरीचोर सिकंदर ऊर्फ आशू शेख (वय 19, रा. घोडेगाव, पुणे) यास भद्रकाली पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून चोरीची बॅटरी आणि दुचाकी जप्त केली आहे.

फुले मार्केटमधील व्यावसायिक सर्फराज कोकणी (रा. हिरवेनगर, वडाळा रोड) यांची जीप दुकानासमोर उभी होती. संशयित सिंकदर याने शुक्रवारी दुपारी एक ते सायंकाळी सातदरम्यान जीपची बॅटरी चोरून नेली. कोकणी यांनी तीन दिवस शोध घेऊनही बॅटरी मिळून आली नाही. अखेर त्यांनी सोमवारी भद्रकाली पोलिसांत गुन्हा दाखल केला. मंगळवारी गुन्हे शाखेचे हवालदार सोमनाथ सातपुते यांना बॅटरीचोर भद्रकाली परिसरात फिरत असल्याची माहिती मिळाली. त्यावरून त्यानी रात्री बाराच्या सुमारास सिकंदरला ताब्यात घेतले. त्याच्याकडून चोरीची बॅटरी व 90 हजारांची बुलेट असा सुमारे 97 हजारांचा ऐवज जप्त केला.

Web Title: battery thief arrested crime

टॅग्स